शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोणत्याही वयात स्पीडने रक्त पंप करेल हृदय, रोज हे फळ खाऊन वाढले हार्ट पंपिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2023 10:09 IST

Heart Pumping : हृदयाची धडधड बरोबर होणं ही एक हेल्दी हार्टची ओळख आहे. जेवढ्या वेळ हार्ट पंप करतो, तेवढ्या वेळा आपल्या धडधड ऐकू येते.

Heart Pumping : हृदयाचं पंप योग्यपणे काम करण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतात. जेणेकरून ब्लड सर्कुलेशन योग्यपणे व्हावं. यासाठी एक्सपर्ट सांगतात की, रोज एक सफरचंद खावं. कारण हृदयासाठी हे फळ फार फायदेशीर आहे. तसेच दररोज शारीरिक हालचाल करावी आणि तणाव घेणं सोडलं पाहिजे.

हृदयाची धडधड बरोबर होणं ही एक हेल्दी हार्टची ओळख आहे. जेवढ्या वेळ हार्ट पंप करतो, तेवढ्या वेळा आपल्या धडधड ऐकू येते. जेव्हा हृदयाचे चेंबर काम करणं बंद करतात तेव्हा पंपींग स्लो होतं. ज्यामागे कार्डियोवस्कुलर डिजीज असतो.

शरीरात कमी होईल ऑक्सीजन

ऑक्सीजन घेण्याचं काम फुप्फुसं करतात, पण शरीराच्या कानाकोपऱ्यात ते हृदय पोहोचवतं. ऑक्सीजन असलेलं रक्त हृदय शरीरातील सगळ्या अवयवांना पोहोचवतं. पंपिंग कमी झाल्यामुळे या अवयवांपर्यंत ऑक्सीजन पोहोचत नाही.

हार्ट पंपिंग वाढण्यासाठी खा हे फळ

हृदयाच्या रूग्णांसाठी सफरचंद हे चांगलं फळ आहे. दररोज नाश्ता आणि लंचच्या मधल्या वेळेत हे फळ खावं. Pubmed वर 2013 मध्ये प्रकाशित शोधानुसार, हे फळ खाल्ल्याने हृदयरोगाचा धोका कमी होतो आणि हृदय निरोगी राहतं. 

अमेरिकन हार्ट असोसिएशन जास्त धोका वाढल्यावर सतत डॉक्टरांचा सल्ला फॉल करण्यास आणि हार्ट फेलिअरच्या कोणत्याही संभावित कारणाला ठीक करण्यास सांगतात. पण त्यासोबतच दररोज योग्य प्रमाणात शारीरिक हालचाल करत रहा. याने हृदयाचं काम चांगलं होतं.

सोडिअममुळे शरीरात जमा होईल पाणी

कधीही प्रमाणापेक्षा जास्त मीठ म्हणजे सोडिअमचं सेवन करू नये. यामुळे शरीराच्या वेगवेगळ्या भागात पाणी जमा होऊ लागतं आणि याच कारणाने हृदयावर दबाव पडू लागतो.

तणाव घेणं सोडा

आपल्याला कळतच नाही की, स्ट्रेस कधी शरीरासाठी घातक ठरू शकतो. त्यामुळे जास्त तणाव घेऊ नका आणि येऊ देऊ नका. यामुळे हृदयाचं काम बिघडतं आणि पंपिंग कमी होते.

वजन कमी करा

जर तुमचं वजन सतत वाढत असेल तर याकडे दुर्लक्ष करू नका. हार्ट पंप योग्यपणे होण्यासाठी वजन कंट्रोलमध्ये ठेवणं फार गरजेचं आहे. लठ्ठपणामुळे हृदयासंबंधी अनेक आजार होतात.

या गोष्टी सोडा

मद्यसेवन, सिगारेट, विडी आणि मादक पदार्थ तुमची हृदयाची धडधड नेहमीसाठी बंद करू शकतात. त्यामुळे हृदयाला नुकसान पोहोचणाऱ्या या गोष्टींपासून दूर राहिलं पाहिजे. 

टॅग्स :Heart DiseaseहृदयरोगHeart Attackहृदयविकाराचा झटकाHealth Tipsहेल्थ टिप्स