शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
4
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
5
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
6
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
7
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
8
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
11
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
12
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
13
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
14
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
15
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
16
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
17
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
18
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
19
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन

सिद्धू यांच्या पत्नीने ४० दिवसात कॅन्सरला दिली मात, जाणून घ्या काय होता आयुर्वेदिक आहार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 10:55 IST

सिद्धू यांनी सांगितलं की, आपण टेस्टच्या नादात संपूर्ण शरीर खराब करतो. पण आम्ही पूर्ण अभ्यास करून डाएट सुरू केली.

माजी क्रिकेटपटू आणि नेते नवज्योत सिंह सिद्धू यांच्या पत्नीला स्टेज ४ चा कॅन्सर निदान झाला होता. हा कॅन्सर इतका वाढला होता की, डॉक्टरांनी जगण्याची केवळ ३ टक्के आशा व्यक्त केली होती. तरीही त्यांच्या पत्नीने हार न मानता, सर्जरी, थेरपी आणि इच्छाशक्तीसोबत लाइफस्टाईलवर लक्ष दिलं. त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, आता त्यांची पत्नी पूर्णपणे कॅन्सरमधून बाहेर पडली असून यात डाएटने तिला खूप मदत केली.

सिद्धू यांनी सांगितलं की, आपण टेस्टच्या नादात संपूर्ण शरीर खराब करतो. पण आम्ही पूर्ण अभ्यास करून डाएट सुरू केली. ज्यानंतर ४० दिवसांमध्येच ४ स्टेजच्या कॅन्सरमधून बाहेर पडता आलं. ही डाएट कॅन्सरशिवाय फॅटी लिव्हर कमी करण्यासही मदत करते. त्यांनी २५ किलो वजनही कमी केलं. ज्या डाएटचा सिद्धू यांनी उल्लेख केला ती पूर्णपणे आयुर्वेदिक आहे. 

सिद्धू यांनी सांगितलं की, कॅन्सरला हरवण्यासाठी लाइफस्टाईलमध्ये बदल करावा लागतो, जो कॅन्सरचा उपचार आहे तोच फॅटी लिव्हरचाही आहे. तुम्ही कॅन्सर सेल्सना शुगर आणि कार्बोहायड्रेट्स देऊ नका. कॅन्सरच्या पेशी आपोआप नष्ट होतील.

कॅन्सरमध्ये घेतला असा चहा

सिद्धू यांनी सांगितलं की, त्यांच्या पत्नीने कॅन्सरच्या उपचारादरम्यान हर्बल चहा घेतला. यासाठी दालचीनी, काळी मिरी, लवंग, छोटी वेलची टाकून पाण्यात टाकून उकडली. यात थोडा गूळ टाकला होता.

जेवणाची वेळ महत्वाची

सिद्धू यांनी सांगितलं की, त्यांची पत्नी सांयकाळी ६ ते ६.३० वाजता जेवण करत होती आणि दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता लिंबू पाण्याने सुरूवात करत होती. डाएटमध्ये अ‍ॅंटी-इन्फ्लेमेटरी आणि अ‍ॅंटी-कॅन्सर असलेले फूड्स होते.

कशी व्हायची दिवसाची सुरूवात?

सगळ्यात आधी लिंबू पाण्याने दिवसाची सुरूवात होत होती. त्यासोबत कच्ची हळद, एक लसूण आणि अ‍ॅपल व्हिनेगर दिलं जात होतं. त्यासोबतच अर्ध्या तासानंतर १० ते १२ कडूलिंबाची पाने दिली जात होती. 

धान्याने कॅन्सर होईल नष्ट

त्यानंतर नट्स, पांढऱ्या पेठ्याचा ज्यूस, एक ग्लास ज्यूस दिला जात होता. ज्यूस तयार करण्यासाठी बीट, गाजर आणि एक आवळा टाकला जात होता. नंतर सायंकाळी रात्रीचं जेवण, ज्यात भात आणि चपाती नव्हती. त्यात केवळ क्विनोआ देत होते. कारण हेच एक धान्य अ‍ॅंटी-इन्फ्लेमेटरी आणि अ‍ॅंटी-कॅन्सर आहे. सोबतच नारळाचा वापर करूनही फायदेशीर आहे.

कसं पाणी दिलं?

सिद्धू यांनी सांगितलं की, त्यांच्या पत्नीला असं पाणी दिलं जातं होतं ज्याचं पीएच लेव्हल ७ असावी. कारण आपल्या शरीराचा जास्तीत जास्त भाग यापासूनच बनला आहे. त्यामुळे कॅन्सरला हरवण्यासाठी त्यावर लक्ष दिलं पाहिजे.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सcancerकर्करोगNavjot Singh Sidhuनवज्योतसिंग सिद्धू