शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

तरूणपणीच म्हातारपण आणतात या सवयी, आजारांचं घर बनतं शरीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2024 09:38 IST

Anti ageing tips : लोक कमी वयातच वृद्ध दिसू लागतात. अनेक गंभीर आजारांचे शिकार होऊन आपला जीवही गमावतात. त्यामुळे तुम्हीही तुमच्या या सवयी सोडून चांगलं जगण्याचा विचार करा.

Anti ageing tips : लोकांना आयुष्य जास्त जगायचं असतं, पण त्यासाठी आपल्या खराब सवयी सोडणं त्यांना जमत नाही. अशा अनेक सवयी असतात ज्या सामान्यपणे लोकांमध्ये बघायला मिळतात. या सवयी फार नुकसानकारक असतात तरीही लोक त्याची चिंता करत नाहीत. याच कारणाने लोक कमी वयातच वृद्ध दिसू लागतात. अनेक गंभीर आजारांचे शिकार होऊन आपला जीवही गमावतात. त्यामुळे तुम्हीही तुमच्या या सवयी सोडून चांगलं जगण्याचा विचार करा.

झोप कमी घेणं

आजकाल स्मार्टफोन आणि इंटरनेटच्या जमान्यात लोकांची झोप उडाली आहे. बरेच लोक असे आहेत जे ना वेळेवर झोपू शकतात ना वेळेवर उठू शकतात. सुरवातीला कमी झोप घेतल्याने इतकी काही समस्या होत नाही, पण काही दिवसाने समस्या सुरू होतात. शरीराला आरामाची गरज असते, जी झोपेच्या माध्यमातून पूर्ण होते. त्यामुळे दिवसातून किमान 7 ते 8 तास झोप घ्यावी.

केमिकल फ्री आणि प्रोसेस्ड फूड

फिट आणि निरोगी रहायचं असेल केमिकल फ्री आणि प्रोसेस्ड फूडचा समावेश असावा. आजकाल बाजारात मिळणारे प्रॉडक्ट्स फार नुकसानकारक असतात. जर स्वत:ला तरूण ठेवायचं असेल तर चांगलं खाणंपिणंही गरजेचं आहे. डाएटमध्ये ताजी फळं आणि भाज्यांचा समावेश करावा. जास्त मांस खाऊ नका. तसेच जास्त तळलेले आणि भाजलेले पदार्थ खाणंही टाळावं.

रोज फिजिकल अॅक्टिविटी करणं

जर तुम्ही आळस करून कोणतीही फिजिकल अॅक्टिविटी करत नसाल तर ही सवय तुमच्यासाठी अजिबात चांगली नाही. जर तुम्ही रोज एक्सरसाइज किंवा फिजिकल अॅक्टिविटी केली तर अनेक गंभीर आजारांपासून तुमचा बचाव होऊ शकतो. सोबतच तुमचं मानसिक आरोग्यही चांगलं राहतं. त्यामुळे रोज एक्सरसाइज आणि मेडिटेशन करा.

दारू आणि सिगारेटचं सेवन

आजकाल दारू आणि सिगारेटचं सेवन कॉमन झालं आहे. पण ते तुमच्या आरोग्यासाठी जास्त नुकसानकारक आहे. जर तुम्ही जास्त काळ दारू आणि सिगारेटचं सेवन केलं तर तुमच्या जीवाला धोका होऊ शकतो.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य