शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

अनेकदा ॲनिमिया म्हटले की महिलांकडे बोट दाखवले जाते; पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2023 11:47 IST

जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांत सुमारे २५ हजार व्यक्तींच्या सीबीसी रक्त तपासण्या करण्यात आल्या आहेत. त्यात ६०-६५ टक्के महिला रुग्णांमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता दिसून आली आहे.

मुंबई : अनेकदा ॲनिमिया म्हटले की महिलांकडे बोट दाखवले जाते; मात्र वास्तविक महिला-पुरुष दोन्ही घटकात ॲनिमियाचे प्रमाण वाढते आहे. बदललेली जीवनशैली आणि आहाराकडे होणारे दुर्लक्ष ही याची प्रमुख कारणे असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे यावर प्रतिबंध करायचा असेल तर आहारात समतोल राखला पाहिजे, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांत सुमारे २५ हजार व्यक्तींच्या सीबीसी रक्त तपासण्या करण्यात आल्या आहेत. त्यात ६०-६५ टक्के महिला रुग्णांमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता दिसून आली आहे.

ॲनिमिया म्हणजे काय?शरीरातील सगळ्या अवयवांना काम करण्यासाठी प्रत्येक पेशीला पुरवला जाणार ऑक्सिजन ज्या लाल रक्त पेशींमधून मिळतो, त्या लाल रक्त पेशींमधले हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होणे म्हणजे ॲनिमिया होय. ॲनिमिया हा आजार दुर्धर वाटत नसला तरी आपल्या शरीरातील प्रत्येक काम करणाऱ्या पेशीला ऑक्सिजनचे प्रमाण कमी मिळत आहे, ही बाब अतिशय गंभीर आहे. यावरून या आजाराची व्याप्ती लक्षात येते. यामध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते. म्हणजेच प्रत्येक पेशीपर्यंत ऑक्सिजन पुरवणाऱ्या यंत्रणेत काहीतरी बिघाड आहे हे लक्षात येते.

ॲनिमियाची लक्षणे  धडधड होणे, थकवा जाणवणे, गळून गेल्यासारखे वाटणे, भूक न लागणे, चिडचिडेपणा, केस लवकर पांढरे होणे, केस लवकर गळणे, जास्त वेळ एकाग्रतेने काम न करता येणे ही ॲनिमियाची लक्षणे आहेत.   वरवर पाहता ही लक्षणे जीवघेणी वाटत नाहीत. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष केले जाते; पण ही लक्षणे गंभीर वाटत नसली तरी दुसऱ्या एखाद्या आजाराची सुरुवात ठरू शकते.

पुरुषांनाही ॲनिमियाचा धोका१५-४९ वर्षे या वयोगटातील पुरुषांमधील प्रमाण

महिलांमध्ये प्रमाण अधिकस्त्रियांमध्ये ॲनिमिया असल्याचे प्रमाण पुरुषांपेक्षा जवळपास तीन पटींनी जास्त आहे.

ज्यांना ज्यांना अशक्तपणा येतो त्या सगळ्यांनाच ॲनिमियाच असेल असे नाही. हिमोग्लोबिनचे प्रमाण योग्य असूनही थकवा का जाणवतोय हे जाणून घेण्यासाठी डॉक्टरांना भेट द्यावी. कारण कदाचित लोहाचे प्रमाण कमी असू शकते. ते कमी असल्यामुळे अशक्तपणा येऊ  शकतो. ॲनिमियाची विविध कारणे, परिणामांसह त्यावरील उपाय जाणून घेणेही महत्त्वाचे आहे.- डॉ. परिक्षित केणी, फिजिशिअन

टॅग्स :Healthआरोग्य