शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

कोलेस्ट्रॉल कमी करण्यासोबतच अनेक आजारांपासून वाचवतो आवळा, तुम्हालाही माहीत नसतील हे फायदे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2022 15:37 IST

Amla Benefits : आवळ्यामध्ये असलेल्या नियोपाइनफ्राइन नावाच्या तत्वामुळे मूडशी संबंधित प्रक्रियांवरही नियंत्रण ठेवता येतं. चला जाणून घेऊ आवळ्याचे आणखी काही खास फायदे

Amla Benefits : आवळा हा आपल्या आरोग्यासाठी वेगवेगळ्या दृष्टीने फायद्याचा ठरतो. न्यूट्रिशन एक्सपर्टनुसार, एका आवळ्यामध्ये दोन संत्री इतकं व्हिटॅमिन सी असतं. त्यासोबतच आवळ्यामध्ये पोलीफेनॉल्स, आयर्न, झिंक, कॅरोटीन आणि फायबर हे तत्व भरपूर प्रमाणात असतात. तसेच व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स, कॅल्शिअम, अॅंटीऑक्सिडेंट्सही यात असतात. त्यासोबतच आवळ्यामध्ये असलेल्या नियोपाइनफ्राइन नावाच्या तत्वामुळे मूडशी संबंधित प्रक्रियांवरही नियंत्रण ठेवता येतं. चला जाणून घेऊ आवळ्याचे आणखी काही खास फायदे.

डोळ्यांसाठी फायदेशीर

आवळ्यामध्ये असलेल्या अॅंटीऑक्सिडेंट्स रेटिनाला ऑक्सिडाइज होण्यापासून वाचवतो. याच्या नियमीत सेवनाने मोतीबिंदू आणि रात आंधळेपणा या समस्याही दूर ठेवता येतात. 

पचनक्रिया चांगली राहते

आवळ्यामध्ये फायबर अधिक प्रमाणात असतं. आवळा गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक स्वच्छ ठेवतो आणि शरीरातील टॉक्सिन दूर करतो. तसेच याने पचनक्रियाही चांगली ठेवण्यात मदत मिळते. याने अॅसिडिटीची समस्याही दूर होते. 

कॅन्सरपासून बचाव

आवळ्यामध्ये अॅंटीऑक्सिडेंट्स भरपूर प्रमाणात असतं. याने कार्सिनोजेनिक पेशींची वाढ थांबवली जाते आणि कॅन्सरपासून बचाव होतो.

वजन कमी करण्यात मदत

आवळा खाल्याने शरीरात प्रोटीनचं प्रमाण वाढतं आणि नायट्रोजनचं संतुलन कायम राहतं. याने शरीरातील फॅट बर्न होतात आणि वजन कमी करण्यात मदत मिळते.

सुरकुत्या दूर करण्यासाठी

आवळा रक्तपेशींमध्ये फॅट जमा होऊ देत नाही. याच्या नियमीत सेवनाने चेहऱ्यावर पिंपल्स आमि सुरकुत्या येण्याची समस्याही दूर होते.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य