शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

अंबील

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2018 09:35 IST

उन्हाळ्यात जीव पाणी पाणी करतो, मग हे खा किंवा प्या!

- शुभा प्रभू-साटमउन्हाळ्यात सारखं पाणी पाणी होतं, खावंसं वाटत नाही. जीव पाणी पाणी करतो; पण सतत शीतपेयं तरी कशी पिणार? कारण ती पिणं हानिकारकच. नुसती सरबतं तरी किती पिणार? पोट डब्ब होतं, तहान भागत नाही ती नाहीच. पुन्हा सतत पाणी पिऊन भूक लागत नाही ती वेगळीच. या आणि अशा प्रकारच्या अनेक तक्रारी परिचयाच्या आहेत. खरं तर आपल्या पारंपरिक पाककृतीत हवामान आणि आहार यांचा उत्कृष्ट ताळमेळ साधलेला आहे; पण हल्ली आपण तो, त्यातल्या अनेक गोष्टी विसरत चाललोय.उन्हाळ्यातल्या तहानेसाठीचीही सोय आपल्या पारंपरिक पदार्थांमध्ये आहे. ज्वारी, बाजरी किंवा नाचणीचं अंबील हा त्यासाठीचा उत्तम पर्याय आहे.

इंग्रजीत ज्याला ब्रॉथ म्हणतात तसा हा प्रकार आहे.घट्टसर पेय. भूक आणि तहान दोन्ही शमवण्यासाठी एकदम सही. यासाठी ज्वारी किंवा बाजरी किंवा नाचणी यापैकी कोणतंही पीठ घ्यावं. उन्हाळ्यात बाजरी उष्ण पडेल असं वाटत असेल तर नाचणी उत्तम.अंबील करताना एक मध्यम वाटी पीठ घ्यावं. साधारण आंबट ताक पिठाच्या दुप्पट घ्यावं. आलं घ्यावं. हवा असेल तर लसूणही घ्यावा. हिरवी मिरची, फोडणीसाठी जिरं, हिंग, मीठ, साखर आणि कोथिंबीर घ्यावी. कढईत तूप तापवून त्यात जिरे आणि हिंग घालावा. नंतर लसूण मिरची आलं हे सर्व बारीक चिरून घालावं.हे सर्व साहित्य किंचित परतून त्यात पीठ घालावं. ते चांगलं परतून घ्यावं. त्यात पाणी घालून भरभर ढवळून घट्ट शिजवून घ्यावं. शिजवताना पिठाची कच्ची चव गेली पाहिजे इतपत ते शिजवावं.शिजवलेलं पीठ गार करून त्यात ताक, मीठ, साखर आणि कोथिंबीर घालून साधारण पातळ करून घ्यावं. आपल्या आवडीनुसार मिरची, लसूण यांचं प्रमाण ठरवावं. अंबील पोटाला थंड असते. नाचणीची असेल तर फारच छान. उन्हाळ्यात पित्ताचा त्रास होतो, त्यांच्यासाठी ही अंबील गुणकारी आहे.महाराष्ट्रात तसेच कर्नाटक भागात ही अंबील खाल्ली/ प्यायली जाते.विकतच्या साखर आणि रसायनं असणाऱ्या गोष्टींऐवजी हे अस्सल देशी एनर्जी ड्रिंक केव्हाही उत्तमच!(खाद्यसंस्कृती आणि पाककला यांचा प्रदीर्घ अभ्यास असणाºया लेखिका मुक्त पत्रकार असून, स्त्रीमुक्ती चळवळीत कार्यरत आहेत. shubhaprabhusatam@gmail.com)

 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स