शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

जमिनीवर झोपण्याचे आरोग्याला होतात एकापेक्षा एक फायदे, कधीच होणार नाहीत या समस्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2022 18:52 IST

Health Tips : जमिनीवर झोपण्याचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत. याने शरीराला आराम तर मिळतोच सोबतच तुमच्या अनेक समस्याही दूर होतात. चला जाणून घेऊ जमिनीवर झोपण्याचे फायदे...

Health Tips : आजकाल बाजारात अनेक आरामदायक बेड उपलब्ध असले तरी गणेश चतुर्थी असो वा नवरात्री तसेच दिवाळी, काही लोक या उत्सवांमध्ये जमिनीवर झोपतात. यामागे काही धार्मिक भावना असल्यातरी जमिनीवर झोपण्याचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत. याने शरीराला आराम तर मिळतोच सोबतच तुमच्या अनेक समस्याही दूर होतात. चला जाणून घेऊ जमिनीवर झोपण्याचे फायदे...

बॉडी पोश्चर चांगलं होतं

जमिनीवर झोपल्याने तुमच्या स्नायूंवर कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त दबाव पडत नाही. तसेच हाडेही नैसर्गिक स्थितीमध्ये असतात. बेडवर किंवा मुलायम गादीवर झोपल्याने तुम्हाला चांगलं तर वाटतं पण त्याने बॉडी पोश्चर बिघडू शकतो. पण जमिनीवर एका चादरीवर झोपल्याने बॉडी पोश्चर चांगला राहतो.

हाडांच्या संरचेनत सुधारणा होते

जमिनीवर झोपल्याने वाकडी-तिकडी झालेली हाडे नैसर्गिक स्थितीत येतात आणि त्यांच्या संरचनेत सुधारणा होते. ही प्रक्रिया फार हळू गतीने होते पण भविष्यात याचे अनेक फायदे बघायला मिळू शकतात. खाली जमिनीवर झोपल्याने हाडांच्या जॉइंट्समध्ये काही इजा झाली असेल तर ती सुद्धा याने बरी होऊ शकते.

पाठीच्या कण्याशी संबंधित समस्या दूर होते

जमिनीवर झोपल्याने तुमचा स्पाइन म्हणजेच पाठीचा कणा सरळ होतो आणि त्यावर दबाव सुद्धा कमी पडतो. इतकेच नाही तर असे केल्याने तुम्हाला पाठीच्या कण्यासंबंधी समस्याही होणार नाहीत. पाठीचा कणा हा शरीराचा सर्वात महत्त्वाचा भाग असतो. कारण तो शरीराच्या पूर्ण नर्व सिस्टीमला कंट्रोल करतो आणि याचा थेट संपर्क हा मेंदुशी असतो. 

पाठदुखीपासून मिळतो आराम

खाली जमिनीवर झोपल्याने पाठीचा कणा सरळ एका रेषेत राहित असल्याने शरीरात रक्तप्रवाह योग्यप्रकारे होतो. आणि हळूहळू पाठदुखीच्या त्रासातून सुटका मिळते. चुकीच्या पद्धतीने झोपल्यास किंवा जाड गादीवर झोपल्याने अनेकांना पाठदुखीचा त्रास होत असतो. अशात खाली जमिनीवर झोपल्याने ही समस्या होणार नाही.

हिप्स आणि खांद्यासाठी फायदेशीर

जमिनीवर झोपल्याने हिप्स आणि खांद्यांचं अलायमेंट चांगलं होतं आणि शरीरातील अनेकप्रकारचं दुखणं दूर होतं. जर तुमच्या खांद्यामध्ये, मानेमध्ये सतत वेदना होत असतील तर जाड गादीवर झोपण्यापेक्षा खाली जमिनीवर झोपणे सुरु करा. काही दिवसातच याचा तुम्हाला फायदा दिसेल. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य