शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

थंड पाण्याने आंघोळ करण्याचे फायदे वाचून व्हाल अवाक्, मग थंडीचाही करणार नाही विचार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2023 16:34 IST

Health Tips : थंड पाण्याने आंघोळ करण्याचा विचार फारच कमी लोक करतात. त्यांना याचे फायदेच माहीत नसतात.

Health Tips : हिवाळ्याला सुरूवात होताच जास्तीत जास्त लोक गरम पाण्याने आंघोळ करायला सुरूवात करतात. पण काही लोक असेही असतात जे हिवाळ्यातही थंड पाण्याने आंघोळ करतात. जास्तीत जास्त लोक गरम पाण्याने आंघोळ करतात. पण गरम पाण्याने आंघोळ करून चांगलं वाटत असलं तरी जास्त गरम पाण्याने आंघोळ करण्याचे वेगवेगळे साइड इफेक्ट्सही आहेत.

थंड पाण्याने आंघोळ करण्याचा विचार फारच कमी लोक करतात. त्यांना याचे फायदेच माहीत नसतात. वेगवेगळ्या रिसर्चनुसार, थंड पाण्याने आंघोळ करणं आरोग्यासाठी वेगवेगळ्या दृष्टीने फायदेशीर आहे. चला जाणून घेऊ थंड पाण्याने आंघोळ करण्याचे फायदे.

अलर्टनेस वाढतो

mensxp.com या वेबसाइटच्या एका रिपोर्टनुसार, थंड पाण्याने आंघोळ करण्याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे अलर्टनेस वाढतो. थंड पाण्याने आंघोळ केल्याने हार्ट रेट वाढतो आणि श्वास घेण्याची व सोडण्याची गतीही वाढते. थंड पाण्याने चेहरा धुतल्याने व्यक्ती जास्त अलर्ट होतो. ब्रिटीश जर्नल ऑफ स्पोर्ट्स मेडिसिनमध्ये प्रकाशित रिसर्चनुसार, थंड पाण्याने आंघोळ केल्याने शरीरावर वेगवेगळा मनोवैज्ञानिक प्रभाव पडतो.

जर्मनीतील येना मेडिकल कॉलेजच्या एका रिसर्चनुसार, थंड पाण्याने शरीराचं मेटाबॉलिज्म वाढतं. मुळात शरीरावर थंड पाणी टाकल्याने शरीराचं तापमान कमी होऊ लागतं. अशात शरीराला गरम ठेवण्यासाठी किंवा शरीराचं तापमान योग्य ठेवण्यासाठी मेटाबॉलिज्मला जास्त काम करावं लागतं. याने व्यक्तीला वजन कमी करण्यातही मदत मिळते.

इम्यून सिस्टीम मजबूत होतं

जर्नल पीलॉस वनमध्ये प्रकाशित एका रिसर्चनुसार, जे लोक थंड पाण्याने आंघोळ करतात ते काम किंवा शाळेत जाण्यासाठी 29 टक्के कमी आजारी पडतात. या रिसर्चमध्ये 3018 लोकांचा समावेश करण्यात आला होता. या रिसर्चमधून असे आढळून आले की, ज्या लोकांनी थंड पाण्याने आंघोळ केली ते कमी दिवस आजारी पडले. तसेच थंड पाण्याने आंघोळ केल्याने लोकांची रोगप्रतिकारक शक्तीही वाढली आणि त्यांची रोजची कामे करण्याची क्षमताही वाढली.

मूड चांगला होतो

काही रिसर्चमधून असेही समोर आले की, थंड पाण्याने आंघोळ केल्याने मूडही बूस्ट होतो. तसेच थंड पाण्याने आंघोळ केल्याने न्यूरोट्रान्समीटर जसे की, नॉर एपिनेफ्रीन आणि एंडॉर्फिन्स अ‍ॅक्टिव होतात. असंही आढळून आलं आहे की, थंड पाण्याने आंघोळ केल्याने लोकांमध्ये डिप्रेशनची लक्षणे कमी होतात.

कशी कराल सुरूवात?

कुणालाही थोडावेळ थंड पाण्याने आंघोळ केल्यावर याचे सकारात्मक परिणाम बघायला मिळतील. तुम्ही काही कोमट पाण्याने आंघोळ केल्यावर काही वेळ थंड पाण्याने आंघोळ करू शकता. थंड पाण्याने आंघोळ करण्याचा वेळ 30 सेकंदपासून ते 2 मिनिटांपर्यंत असावा. तर काही लोक सांगतात की, 5 ते 10 मिनिटे थंड पाण्याने आंघोळ करावी.

काय घ्यावी काळजी?

थंड पाण्याने आंघोळ केल्याचे वेगवेगळे फायदे होत असले तरी थंड पाण्याने आंघोळ करण्याला मेडिकल थेरपीचा पर्याय समजू नये. खासकरून अशा लोकांनी हे करू नये जे डॉक्टरांकडून डिप्रेशनचा उपचार घेत आहेत. हृदयरोग असलेल्या व्यक्तींनी थंड पाण्याने आंघोळ करणे टाळले पाहिजे. कारण यावेळी हृदयाची गति वाढते. अशात हार्ट अटॅक येण्याचाही धोका असतो.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य