शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

टॅबलेट्सच्या पाकिटांवर ही लाल रेषा का असते? तुम्हालाही नसेल माहीत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2023 12:35 IST

आम्हाला खात्री आहे की, अनेकांना याचा अर्थ माहीत नसेल, तोच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

डॉक्टरकडे जाऊन मेडिकलमधून औषधं घेणाचं प्रमाण आता खूप वाढलं आहे. आधी लोकांच्या पर्स किंवा बॅगमध्ये आवश्यक वस्तू राहत होत्या. आता लोकांकडे औषधांचा एक वेगळा बॉक्स असतो. त्यात वेगवेगळ्या समस्यांसाठी औषधं असतात. तुम्हीही अनेकदा औषधं घेतली असतील. पण तुम्ही कधी गोळ्यांच्या स्ट्रीपवरील लाल रेष बघितली आहे का? जर बघितली असेल तर त्याचा अर्थ तरी माहीत आहे का? आम्हाला खात्री आहे की, अनेकांना याचा अर्थ माहीत नसेल, तोच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

स्ट्रीपवर का असते ही लाल रेषा?

रिपोर्टनुसार, गोळ्यांच्या ज्या पॅकेटवर अशाप्रकारची लाल लाइन असते, ती औषधं तुम्ही डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खरेदी करू नये. केमिस्टना ही औषधं विकण्याची परवानगी केवळ तेव्हाच दिली जाते जेव्हा या औषधांसाठी एखाद्या डॉक्टरने तुम्हाला चिठ्ठी दिली असेल.

अ‍ॅंटीबायोटिक औषधांच्या दुरूपयोगावर लक्ष ठेवण्यासाठी औषधांच्या पॅकेटवर लाल रेषा दिली जाते. स्ट्रीपवर लाल रेषा देण्याचा उद्देश टीबी, मलेरिया, लघवीसंबंधी संक्रमण आणि इतकंच काय तर एचआयव्हीसहीत अनेक गंभीर आजारांसाठी डॉक्टरांच्या परवानगी शिवाय किंवा थेट केमिस्टकडून अ‍ॅंटीबायोटिकच्या खरेदी-विक्रीला रोखणं हा आहे. 

आरोग्य आणि परिवार मंत्रालयानुसार, अशाप्रकारची औषधं खासकरून अ‍ॅंटीबायोटिक्स ज्यांच्या पॅकेजिंगवर लाल रेषा असते, त्यांचा वापर एखाद्या योग्य डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय कधीही करू नये. जागरूक रहा, सुरक्षित रहा.

काय आहे Rx चा अर्थ?

आता आपण बघुया की, काही औषधांच्या पॅकेटवर Rx असं लिहिलेलं असतं. याचा अर्थ असा होतो की, हे औषध केवळ डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावं. जर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अशाप्रकारचं औषध घेतलं तर तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. 

काय आहे NRx चा अर्थ?

काही औषधांच्या पॅकेटवर NRx असं लिहिलेलं असतं. याचा अर्थ असा होतो की, हे नशेचं औषध आहे आणि हे केवळ तेच विकू शकतात ज्यांच्याकडे याचं लायसन्स आहे.

XRx चा अर्थ?

काही औषधांच्या पॅकेटवर XRx असं लिहिलेलं असतं. हे एक असं औषध आहे जे केवळ डॉक्टर विकू शकतात आणि त्यांच्याकडे यांचं लायसन्स असावं. हे औषध डॉक्टर थेट रूग्णांना देऊ शकतात. रूग्ण हे औषध मेडिकल स्टोरमधून खरेदी करू शकत नाही. भलेही तुमच्याकडे डॉक्टरांनी दिलेली चिठ्ठीही असेल तरी.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य