मुंबई: अरुण अग्रवालने आज येथे माजी राष्ट्रीय चॅम्पियन अलोककुमारचा अटीतटीच्या लढतीत पराभव करीत सीसीआय क्लासिक बिलियर्ड्स तथा स्नूकर स्पर्धेच्या उपांत्यफेरीत स्थान प्राप्त केले आहे़ तर जेतेपदाचा प्रबळ दावेदार पंकज आडवाणी जागतिक कांस्यपदक विजेता देवेंद्र जोशीविरुद्ध ५३० चे शानदार ब्रेक्स लावून अंतिम चारमध्ये धडकला़ तत्पूर्वी राष्ट्रीय चॅम्पियन सौरव कोठारीने ४९४ चे ब्रेक्स लावले होते, मात्र आडवाणी त्याच्यापुढे निघून गेला़ आडवाणी उपांत्यफेरीत रुपेश शाहशी लढेल़ दुसर्या उपांत्यफेरीची लढत अग्रवाल आणि दोनवेळचा विश्व उपविजेता धु्रव सितवाला यांच्यात होईल़ शाहने उपांत्यपूर्व फेरीत विश्व कांस्यपदक विजेती अशोक शांडिल्यचा तर सितवालने कोठारीचा पराभव केला़
आडवाणी, अग्रवाल उपांत्यफेरीत दाखल
By admin | Updated: May 14, 2014 02:14 IST