शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

दातांवरील पिवळे डाग घालवण्याचे जबरदस्त आयुर्वेदिक उपाय, लगेच दात होईल चमकदार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2024 13:36 IST

Yellow Teeth Problem : डॉक्टरांनी काही आयुर्वेदिक जडीबुटींच्या मदतीने दात चमकदार आणि निरोगी ठेवण्याच्या टिप्स दिल्या आहेत.

Yellow Teeth Problem :  सामान्यपणे जास्तीत जास्त लोक आपल्या वेगवेगळ्या आरोग्यसंबंधी समस्यांची खूप काळजी घेतात. पण एक महत्वाची गोष्ट ते विसरतात. ती म्हणजे तोंडाची स्वच्छता. ज्यामुळे अनेक गंभीर समस्या होऊ शकतात. बऱ्याच लोकांना दात पिवळे होण्याची समस्या होते. ज्यामुळे ते चारचौघात मोकळेपणाने हसूही शकत नाहीत. सोबतच हिरड्यांमध्ये वेदना, दात दुखणे, किड लागणे, तोंडातून दुर्गंधी येणे आणि दात कमजोर होणे अशा समस्या होतात. अशात डॉक्टरांनी काही आयुर्वेदिक जडीबुटींच्या मदतीने दात चमकदार आणि निरोगी ठेवण्याच्या टिप्स दिल्या आहेत.

आंबे आणि पेरूची पाने

आंबे आणि पेरूची पाने दातांवर घासल्याने ते पांढरे होण्यास मदत मिळते. ही हिरवी पाने इनेमल क्लीनरच्या रूपात काम करतात. यासाठी तुम्हाला लसूण, सैंधव मीठ, पेरू आणि आंब्याची पाने बारीक करून पावडर बनवा. हे पावडर रोज दातांवर घासा. याने हिरड्याही मजबूत होतात.

बाभळीच्या फांद्या आणि पाने

दात पांढरे करण्यासाठी आणि दातांची समस्या दूर करण्यासाठी बाभळी एक शक्तीशाली जडीबुटी आहे. या जडीबुटीमध्ये अॅंटी- मायक्रोबियल गुण असतात. बाभळीची पाने किंवा फांद्या चावल्याने अॅंटी-बॅक्टेरिअल एजंट रिलीज होतात. बाभळीच्या कोवळ्या फांद्यांचा टूथब्रशसारखा वापर करू शकता. बाभळीमध्ये आढळणारं टॅनिन दात चमकदार करतं.

वडाची फांदी

वडाच्या कोवळ्या फांदीचा तुम्ही टूथब्रशसारखा वापर करू शकता. या फांदीने दात घासले तर खूप फायदा होतो. याने दात केवळ चमकदारच नाही तर दात आणि हिरड्यांचं आरोग्यही चांगलं राहतं.

कडूलिंब

दातांचा पिवळेपणा घालवायचा असेल आणि दात चमकदार करायचे असतील तर कडूलिंबाचं झाड एक बेस्ट उपाय आहे. कडूलिंबाच्या फांद्यांचा वापर आजही भारतात टूथब्रश म्हणून वापर करतात. कडूलिंबाच्या तेलामध्ये अॅंटी-सेप्टिक गुण असतात. ज्यामुळे तोंडाची दुर्गंधी दूर होते. दातांमधील कीटाणू दूर होतात आणि दातांना किड लागण्याची समस्या दूर होते.

तुळशी

तुळशीची काही पाने वाळवा, त्यांचं पावडर तयार करा आणि हे पावडर बोटाने दातांवर घासा. तुळशीच्या पानांमुळे दातांची चांगली स्वच्छता होते आणि दात चमकदार होतात. याने पायरिया म्हणजे हिरड्यातून रक्त येण्यासारखी समस्या दूर होते.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य