एक चमचा तूप करतं चमत्कार... फायदे वाचून लगेच खाणं सुरू कराल!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2020 12:33 PM2020-01-06T12:33:12+5:302020-01-06T12:34:08+5:30

तूप हा पौष्टिक आहारातील एक महत्त्वाचा घटक आहे. तूप खाल्याने शरीराचे आरोग्य उत्तम राखण्यास मदत होते.

Add one tsp of ghee to breakfast, lunch and dinner | एक चमचा तूप करतं चमत्कार... फायदे वाचून लगेच खाणं सुरू कराल!

एक चमचा तूप करतं चमत्कार... फायदे वाचून लगेच खाणं सुरू कराल!

googlenewsNext

तूप हा पौष्टिक आहारातील एक महत्त्वाचा घटक आहे. तूप खाल्याने शरीराचे आरोग्य उत्तम राखण्यास मदत होते. मात्र अनेकदा डाएट करताना तूपाचे पदार्थ खाणं टाळलं जातं. तूपामुळे वजन वाढतं किंवा कोलेस्ट्रॉल वाढतं असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला तुमचा विचार बदलण्याची गरज आहे. कारण तूप आरोग्याच्या समस्या वाढवत नाही तर अनेक समस्यांवर उपचार करण्याचं काम करतं. 

मर्यादित प्रमाणात तूपाचा आहारात समावेश केला तर ते वजन कमी करण्यासाठी मदत करतं. म्हणूनच डायटिशयन्सही चपातीला तेलाऐवजी तूप लावून खाण्याचा सल्ला देतात. तूप जेव्हा चपातीसोबत एकत्र होतं, त्यावेळी त्यातील ग्लायसेमिक इंडेक्स कमी होतं. ज्यामुळे हे मधुमेहींसाठीही फायदेशीर ठरतं आणि ज्या व्यक्ती वजन कमी करण्यासाठी धडपडत असतात त्यांच्यासाठीही ते फायदेशीर ठरतं.

तूप खाण्याचे आरोग्यदायी फायदे

- त्वचा तजेलदार बनवण्यासाठी तूप अत्यंत फायदेशीर ठरते. तूपातील पौष्टिक घटक त्वचेचा कोरडेपणा दूर करून ती तजेलदार ठेवण्यासाठी मदत करतात.

- शुद्ध तूपामध्ये सीएलए असतं आणि हे मेटाबॉलिज्म अ‍ॅक्टिव्ह ठेवतं. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. सीएलए इन्सुलिनचे प्रमाण कमी ठेवतं. ब्लड शुगरही नियंत्रणात राहते. तसेच पोटही बराच वेळ भरल्याप्रमाणे वाटते. 

- हृदयासाठीही तूप अत्यंत फायदेशीर ठरतं. हार्टला होणारे ब्लॉकेज दूर होतात. तूप एका ल्यूब्रिकंट्सप्रमाणे हार्ट आणि ब्लड वेसल्सचं काम नियंत्रणात ठेवतं. त्यामुळे हृदयाशी निगडीत आजार दूर ठेवण्यासाठी मदत करतं. 

- तूपामध्ये व्हिटामिन ए, डी आणि कॅल्शियम, फॉस्फरस, मिनरल्स, पोटॅशिअम यांसारखी अनेक पोषक तत्वे असतात. यामुळे सांधेदुखीचा त्रासही कमी होतो. तसेच पीसीओडी, मधूमेह, ब्लड प्रेशर, अ‍ॅसिडीटी यासह अनेक गोष्टींसाठी तूप गुणकारी आहे. 

- तूपामुळे रक्त आणि आतड्यांमध्ये असलेलं कोलेस्ट्रॉल कमी होतं, कारण यामुळे बायलरी लिपिडचा स्त्राव वाढतो. जो शरीरामधील बॅड कोलेस्ट्रॉल आणि गुड कोलेस्ट्रॉल वाढवतं. 

- तूपामुळे ब्लड सेल्समध्ये जमा झालेलं कॅल्शिअम कमी होण्यास मदत होते. त्यामुळे ब्लड सर्क्युलेशन योग्य पद्धतीने होतं. हे शरीराची रोगप्रतिकार शक्ती मजबुत करण्यासाठी मदत करतं. 

- गॅसच्या त्रासाने हैराण झाला असाल तर तूप खाणं फायदेशीर ठरते. त्यामुळे जेवणात तूपाचा समावेश करणे फायदेशीर ठरते.

- तूपाचा स्मोकिग पॉइंट कमी असतो आणि त्यामुळेच तूपामुळे इतर तेलांपेक्षा जास्त धूर होतो. पदार्थ तयार करताना हा सहजपणे जळत नाही आणि त्यामुळेच हे पचण्यासाठी उत्तम असते. याचकारणामुळे तुम्ही जेव्हा चपाती आणि तूप एकत्र खाता, त्यावेळी पचनशक्ती उत्तम होते.

- तूप डोळ्यांसाठी फार फायदेशीर ठरते. ग्लुकोमा (काचबिंदू) रूग्णांसाठीही तूप फायदेशीर ठरते. तसेच तूप खाल्याने स्मरणशक्ती वाढते त्याचप्रमाणे मेंदूची कार्यक्षमता वाढविण्यासाठी तूप फायदेशीर ठरते.

दररोज तूप खा परंतु प्रमाण निश्चित करा 

तूपामध्ये तेलापेक्षा अधिक पोषक तत्व असतात. तूप खाणं शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतं, परंतु जर हे प्रमाणापेक्षा जास्त खालं तर फायद्यांऐवजी नुकसान होऊ शकतं. त्यामुळे लक्षात ठेवा, दररोज फक्त एक टी स्पून तूपापेक्षा जास्त तूप खाऊ नका. बटर पेक्षा तुपाचे सेवन करणे अधिक चांगले असते. तुप घरी तयार करणं अधिक उत्तम ठरते.

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं असतं. 
 

Web Title: Add one tsp of ghee to breakfast, lunch and dinner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.