शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पचनक्रिया मजबूत करण्यासाठी बेस्ट 3 उपाय, अपचन आणि पोट फुगणंही होईल बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2024 10:24 IST

जर तुमची पचनक्रिया चांगली नसेल किंवा पोट खराब असेल तर तुमचं आरोग्य बिघडू शकतं.

आजकाल धावपळीच्या जीवनात चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयी आणि सुस्त जीवनशैलीमुळे लोकांना गॅस, अ‍ॅसिडिटी, अपचन, बद्धकोष्ठता आणि पोट फुगण्याच्या समस्या होतात. ज्यामुळे इतरही अनेक आजारांचा सामना करावा लागतो. हे सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की, जास्तीत जास्त आजार हे पोटापासूनच सुरू होतात.

जर तुमची पचनक्रिया चांगली नसेल किंवा पोट खराब असेल तर तुमचं आरोग्य बिघडू शकतं. पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी पुन्हा पुन्हा औषधांचा वापर करणंही पोटाच्या आरोग्यासाठी चांगलं नसतं. यासाठी काही घरगुती उपायही बेस्ट ठरतात. जर स्थिती फारच वाईट असेल तर मग डॉक्टरांकडे जा.

सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट आणि डायटीशिअन रुजुता दिवेकर यांनी सीक्रेट्स ऑफ गुड हेल्थ सीझन 2 मध्ये पोट निरोगी आणि चांगलं ठेवण्यासाठी एक खास उपाय सांगितला आहे. या उपायात तीन गोष्टींचा समावेश करायचा आहे. ज्यात तूप, गूळ आणि केळीचा समावेश आहे. यांमुळे तुमचं पचन चांगलं होतं.

दुपारी गूळ आणि तूप खा

गूळ खाण्याचे आरोग्याला अनेक फायदे मिळतात. जर तुम्ही दुपारच्या जेवणात एक चमचा गूळ आणि तूपाचा समावेश केला तर तुमची पचनक्रिया सुधारते. तूपाने शरीराला हेल्दी फॅट मिळतं आणि गूळ तुमच्या साखरेच्या लालसेला कमी करण्यात मदत करतो. तसेच याने अनेक पोषक तत्वही मिळतात.

पोट चांगलं ठेवतात केळी

केळी खाल्ल्याने एनर्जी मिळते आणि सूजही कमी होते. रोज सकाळी किंवा सायंकाळी 4 ते 6 वाजेदरम्यान नाश्त्यात एक केळी खा. केळीमध्ये फायबर आणि इलेक्ट्रोलाइट्स असतात जे गॅस आणि सूज कंट्रोल करतात. तसेच दह्यामध्ये 3 ते 4 काळे मनुके टाकून खाल्ल्यास प्रीबायोटिक आणि प्रोबायोटिक गुणांच्या मिश्रणाने आपलं पचन वाढवू शकता. यामुळे डोकेदुखी आणि अॅसिडिटी कमी होते. 

अ‍ॅक्टिव रहा

दररोज 30 मिनिटे पायी चालायला हवं कारण पायी चालल्याने पचनास मदत मिळते. अ‍ॅक्टिव राहिल्याने वातही कंट्रोल ठेवण्यास मदत मिळते. दुपारी 15 ते 20 मिनिटांसाठी एक झोप घ्या. कॅफीनचं सेवनही कमी करा. 3 किंवा 4 वाजतानंतर जास्त चहा किंवा कॉफीचं सेवन टाळा. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य