Health Tips : मिठाशिवाय खाण्याची कल्पनाच केली जाऊ शकत नाही. प्रत्येक घरात मिठाचा वापर पदार्थांला चव देण्यासाठी केला जातो. मिठाचे आरोग्याला अनेक फायदे असले तरी मिठाला 'सायलेंट किलर' म्हटलं जातं. मिठानं पदार्थाला तर चव मिळते, पण दरवर्षी १९ लाख लोकांचा जीवही जातो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं ही आकडेवारी दिली असून मीठ कमी खाण्याचा सल्ला दिला आहे.
रोज किती मीठ खावं?
WHO नं आपल्या नव्या गाइडलाईन्समध्ये सांगितलं की, रोज केवळ २ ग्रॅम मीठ खावं. सामान्यपणे लोक साधारण ४.३ ग्रॅम मीठ खातात. याचा अर्थ लोक प्रमाणापेक्षा दुप्पट मीठ खात आहेत.
जास्त मीठ खाण्याचे नुकसान?
प्रमाणापेक्षा जास्त मीठ खाल्ल्यानं आरोग्यासंबंधी अनेक गंभीर समस्या होतात. जसे की, हाय ब्लड प्रेशर, हृदयरोग आणि किडनीसंबंधी समस्या होतात. WHO नं आपली नवीन गाइडलाईन जारी केली असून कमी सोडिअम असलेलं मीठ वापरण्याचा सल्ला दिला आहे. सोबतच जास्त मीठ असलेल्या पदार्थांचं सेवन टाळण्याचा सल्ला दिला आहे. फास्ट फूड आणि जंक फूडमध्ये जास्त प्रमाणात मीठ असतं.
मिठानं दरवर्षी मरतात १९ लाख लोक
WHO नं जारी केलेल्या माहितीनुसार, खाद्य पदार्थांमधून जास्त मीठ खाल्ल्यानं दरवर्षी १९ लाख लोकांचा जीव जातो. WHO नं सल्ला दिला आहे की, रोज केवळ २ ग्रॅम मीठ खायला हवं. पण लोक दुप्पट मीठ खात आहेत.
कोणतं मीठ चांगलं?
WHO नं साध्या मिठाऐवजी कमी सोडिअम असलेलं मीठ वापरण्याचा सल्ला दिला आहे. पोटॅशिअम असलेलं मीठ एक चांगला पर्याय आहे. यात सोडिअम क्लोराइडऐवजी पोटॅशिअम क्लोराइड असतं.
पोटॅशिअम असलेल्या मिठाचे फायदे
पोटॅशिअम असलेल्या मिठानं दोन फायदे होतात. पहिला फायदा म्हणजे यात सोडिअमचं प्रमाण कमी असतं, ज्यामुळे हाय ब्लड प्रेशरचा धोका कमी होतो. यानं पोटॅशिअमचं प्रमाण वाढतं, जे हृदयाच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. बरेच लोक सोडिअम जास्त आणि पोटॅशिअम कमी खातात. अशात पोटॅशिअम असलेलं मीठ हृदयरोग, स्ट्रोक आणि अकाली निधनाचा धोका कमी करतं.
कुणी खाऊ नये पोटॅशिअम असलेलं मीठ?
पोटॅशिअम असलेलं मीठ टेस्टला साध्या मिठासारखंच असतं. याचा जेवण बनवताना आणि खाण्यात साध्या मिठासारखाच वापर केला जातो. पण पोटॅशिअम असलेलं मीठ काही लोकांसाठी नुकसानकारक ठरू शकतं. ज्या लोकांना किडनीसंबंधी आजार आहे, त्यांनी हे मीठ खाऊ नये. हे मीठ साध्या मिठापेक्षा महागही असतं.
जास्त सोडिअम टाळा
प्रोसेस्ड फूडमध्ये जास्त सोडिअम असतं, जेवणात टाकल्या जाणाऱ्या मिठात ते जास्त नसतं. त्यामुळे तुम्ही कमी सोडिअम असलेलं पदार्थ खायला हवे. प्रोसेस्ड फूड कमी खा आणि ताजी फळं व भाज्या जास्त खा.