शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोलेस्ट्रॉल आणि हार्ट अटॅकचा धोका वाढवू शकतं 'असं' तेल, FSSAI ने सांगितलं कोणतं तेल बेस्ट...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2024 12:49 IST

Best Cooking Oil : काही तेल हे आरोग्यासाठी नुकसानकारक असतात. या नुकसानकारक तेलाच्या वापराने लठ्ठपणा, हृदयरोग, कोलेस्ट्रॉल वाढणं, पचनासंबंधी समस्या जसे की, अपचन, जुलाब इत्यादी समस्या होतात.

Best Cooking Oil : तेल शरीरासाठी खूप महत्वाच्या पोषक तत्वांपैकी एक आहे. तेलाने शरीराल ऊर्जा मिळते, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स अब्जॉर्ब करण्यासही मदत मिळते. शरीराच्या वेगवेगळ्या क्रिया पार पाडण्यासाठी सुद्धा तेलाची मदत मिळते. तसेच शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करून गुड कोलेस्ट्रॉल वाढवण्यासही तेलाने मदत मिळते. 

पण काही तेल हे आरोग्यासाठी नुकसानकारक असतात. या नुकसानकारक तेलाच्या वापराने लठ्ठपणा, हृदयरोग, कोलेस्ट्रॉल वाढणं, पचनासंबंधी समस्या जसे की, अपचन, जुलाब इत्यादी समस्या होतात. हेच कारण आहे की, तुम्हाला माहीत असावं की, जेवण बनवण्यासाठी कोणतं तेल वापरावं आणि किती वापरावं. 

भारतात खाद्यपदार्थांच्या गोष्टींच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवणारी संस्था एफएसएसआयने सांगितलं आहे की, आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी कोणतं तेल वापरावं आणि किती वापरावं.

तेलांचा बदलून वापर करा

वेगवेगळे तेल वेगवेगळ्या प्रकारचे फॅटी अ‍ॅसिड देतात. जे शरीराच्या वेगवेगळ्या कामासाठी गरजेचे असतात. तेलाचे चांगले फायदे मिळवण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या तेलांचा वापर केला पाहिजे.

उदाहरण द्यायचं तर तुम्ही जर पोहे बनवत असाल तर तिळाच्या तेलाचा वापर केला पाहिजे, डाळीला तूपाचा तडका दिला पाहिजे. रात्री भाजी बनवण्यासाठी तुम्ही सनफ्लॉवर तेलाचा वापर केला पाहिजे.

जेवण बनवण्यासाठी चांगलं तेल कोणतं?

FSSAI नुसार, जेवण बनवण्यासाठी वेगवेगळ्या तेलांचा वापर करणं फायदेशीर ठरतं. तुम्ही भाजी बनवण्यासाठी सनफ्लॉवर, राईस ब्रान तेलांचा वापर करू शकता. जर तुम्ही रोज तेल बदलू शकत नसाल तर एफएसएसएआयने सल्ला की, तुम्ही तेल दर महिन्यात बदला. तेल वापरण्याच्या योग्य पद्धतीने हृदय आणि शरीर निरोगी राहतं. तसेच तेलाचा वापर कमी करावा.

या गोष्टींची घ्या काळजी

ऑलिव्ह आईल, सोयाबीन तेल, फल्ली तेल आणि सनफ्लॉवर तेल हे आरोग्यासाठी चांगले असतात. खोबऱ्याचं तेल आणि पाम ऑइलचा वापर कमी प्रमाणात केला पाहिजे. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य