स्वाइन फ्लूची आठ जणांना लागण
By Admin | Updated: August 26, 2015 23:32 IST2015-08-26T23:32:33+5:302015-08-26T23:32:33+5:30
१२ जणांची प्रकृती चिंताजनक

स्वाइन फ्लूची आठ जणांना लागण
१ जणांची प्रकृती चिंताजनक पुणे : शहरात स्वाइन फ्लूची तीव्रता वाढू लागली असून बुधवारी आणखी ८ जणांना या आजाराची लागण झाल्याचे तपासणीतून स्पष्ट झाले. त्यामुळे यावर्षातील लागण झालेल्यांची संख्या ८८५ वर पोहोचली आहे. दरम्यान, लागण झालेल्या १२ जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.बुधवारी दिवसभरात १ हजार ३२६ जणांची स्वाइन फ्लूची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ९८ संशयितांना टॅमीफ्लू औषधे देण्यात आली आणि २० जणांच्या घशातील कफाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. लागण झालेल्या २७ रुग्णांना शहरातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. त्यापैकी १२ जण अत्याव्यस्थ असून त्यांना कृत्रिम श्वासोश्वासावर ठेवण्यात आले आहे. दरम्यान, पूर्णपणे बरे झालेल्या ३ रुग्णांना आज रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.