शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
2
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
3
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
4
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
5
शेअर बाजाराचा बुल सुस्साट, Sensex ८० हजारांपार; Nifty १९० अंकांनी वधारला; IT स्टॉक्समध्ये खरेदी
6
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
7
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला; लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच
9
पत्नीच्या मदतीनं करू शकता ₹४४,७९३ च्या मंथली पेन्शनचा जुगाड; एका झटक्यात मिळतील ₹१,११,९८,४७१
10
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
11
Pahalgam Terror Attack: गोळ्या झाडल्या जात होत्या, मागे राहिलेले मारले जात होते... धावत होते
12
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
13
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
14
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका
15
UPSC Result : निरक्षर आईने दाखविला यूपीएससीचा मार्ग;डाॅ. अक्षय मुंडे याची यशाला गवसणी
16
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
17
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
18
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
19
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
20
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी

70 टक्के व्यसनी लोक मानसिक आजाराचे शिकार; जागतिक मानसिक आराेग्य दिन विशेष

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2022 06:03 IST

मानसिक आजारांबाबत समाजात जागृती करण्यासाठी दरवर्षी १० ऑक्टाेबर हा जागतिक मानसिक आराेग्य दिन म्हणून पाळला जाताे.

लाेकमत न्यूज नेटवर्कपुणे : तीसवर्षीय समीर सुरुवातीला थाेडी दारू प्यायचा. मात्र, ते व्यसन सहा महिन्यांत वाढले. त्याच्या मनात आत्महत्येचाही विचार यायचा. घरच्यांनी त्याला रुग्णालयातील मानसाेपचार तज्ज्ञांना दाखवले. डाॅक्टरांनी त्याचे वैद्यकीयदृष्ट्या मूल्यांकन केले असता दारू पिण्याचे कारण हाेते. त्याला आलेले नैराश्य. डाॅक्टरांनी त्याच्या व्यसनाधीनतेसह या मानसिक आजारांवरही उपचार केल्याने ताे व्यसनाधीनतेतून बाहेर पडला आहे.

मानसिक आजारांबाबत समाजात जागृती करण्यासाठी दरवर्षी १० ऑक्टाेबर हा जागतिक मानसिक आराेग्य दिन म्हणून पाळला जाताे. मानसिक आजारांची कारणे वेगवेगळी असतात; परंतु व्यसनी लाेकांना मानसिक आजार असल्याचे आढळून येत आहे. दारूच्या आहारी गेलेल्या बहुतांश म्हणजेच ६० ते ७० टक्के जणांना काही ना काही मानसिक आजार आढळून येत असल्याचे मानसाेपचार तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे केवळ त्याच्या व्यसनाधीनतेवर नव्हे, तर त्याच्या या मानसिक आजारावरही उपचार करणे गरजेचे असते. त्यामुळे नातेवाइकांनी केवळ दारूसाठी नव्हे तर त्याचे मानसिक आजारांचे निदान करण्यासाठी मानसाेपचारतज्ज्ञांना दाखवणे गरजेचे असते.

बाॅर्डरलाइन पर्सनॅलिटी डिसाॅर्डरमध्ये त्यांच्या स्वभावातच दाेष असताे. त्यातून ताे वारंवार त्या व्यसनाकडे ओढला जाताे, तसेच इंपल्सिव्ह म्हणजे त्यांच्यामध्ये तारतम्य नसते. एकाचवेळी खूप दारू पिणे, पत्ते खेळणे असे दिसून येते. हायपर सेन्सिटिव्ह ज्यामध्ये ताे रागात त्याच्या किंवा स्वत:च्या जिवाला बरेवाईट करताे. यामध्ये स्वत:च्या हातावर वार करणे असे प्रकार दिसून येतात. 

मोबाइलवेड्या शाळकरी मुलांचा होणार सर्व्हेसांगली : कोरोना व लॉकडाऊन काळात मुलांच्या शिक्षणासाठी मोबाइल अपरिहार्य बनला; पण तोच आता पालकांसाठी चिंतेची बाब ठरला आहे. मोबाइलचे व्यसन जडलेल्या मुलांच्या व्यसनमुक्तीसाठी जिल्हा परिषदेने मोहीम हाती घेतली आहे. माध्यमिक शिक्षण विभाग व इस्लामपुरातील सुश्रूषा संस्थेतर्फे ७६६ माध्यमिक शाळांत मोबाइलविषयक सर्वेक्षण केले जाणार आहे.     विद्यार्थ्यांचे ऑनलाइन मानसशास्त्रीय मापन केले जाणार आहे. मोबाइलमुक्तीसाठी तज्ज्ञांमार्फत  समुपदेशन केले जाईल.

राेज ४० ते ५० रुग्ण येतात. त्यापैकी व्यसनी असलेल्यांची संख्या जास्त असते. व्यसनींमध्ये बहुतांश जणांना नैराश्य असल्याचे दिसून येते. व्यसनी व्यक्तीना मानसाेपचार तज्ज्ञांना दाखवून त्याला इतर काही मानसिक आजार आहे का, हे  पाहून उपचार करावेत.- डाॅ. मनजित संत्रे, विभागप्रमुख, मानसाेपचार विभाग, वायसीएम रुग्णालय

—-

टॅग्स :Mental Health Tipsमानसिक आरोग्य