राज्यात ६७८ पॉझिटिव्ह रुग्ण (जोड बॉक्स)
By Admin | Updated: February 20, 2015 01:10 IST2015-02-20T01:10:13+5:302015-02-20T01:10:13+5:30

राज्यात ६७८ पॉझिटिव्ह रुग्ण (जोड बॉक्स)
>बॉक्स...-राज्यात सर्वात जास्त मृत्यू नागपूर जिल्ह्यातडॉ. सावंत यांनी सांगितले, राज्यात आतापर्यंत स्वाईन फ्लूने ८३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यातील ४० टक्के मृत्यू एकट्या नागपूर जिल्ह्यातील आहेत. शहरात २२ तर ग्रामीण भागात तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यातच मध्य प्रदेशातील सहा रुग्णांचा नागपुरात मृत्यू झाला आहे. असा एकूण ३१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नागपूर विभागात चंद्रपूरमध्ये दोन, वर्धेत दोन आणि गोंदियात दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बॉक्स...-मेडिकलमध्ये ३९ रुग्ण भरतीमेडिकलच्या स्वाईन फ्लू वॉर्डात ३० रुग्ण तर लहान मुलांच्या अतिदक्षता विभागात ९ रुग्ण असे ३९ रुग्ण भरती आहेत. यात १७ रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. महानगरपालिकेच्यावतीने १० तपासणी केंद्र उघडण्यात आले आहेत. यात रुग्णाचे अ, ब आणि क असे वर्गीकरण करून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत २५ हजार २७१ रुग्णांची तपासणी करण्यात आली असून २७ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्याची माहिती, डॉ. सावंत यांनी दिली. बॉक्स...-१०९ रुग्णांना घेऊन संचालकांचा घूमजावस्वाईन फ्लूविषयी माहिती देताना सार्वजनिक आरोग्य विभागाचे संचालक डॉ. सतीश पवार यांनी गुरुवारी १०९ रुग्ण आढळून आल्याची माहिती दिली. डॉ.पवार यांनी सुरुवातीला हे सर्व रुग्ण पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली, परंतु सार्वजनिक आरोग्यमंत्री यांनी यात हस्तक्षेप करताच हे रुग्ण संशयित असल्याचे डॉ. पवार यांनी सांगितले. रुग्णांच्या आकडेवारीत डॉ. पवार यांनी घूमजाव केल्याने यात मोठा गोंधळ असल्याचे यावरून दिसून येते. बॉक्स...-आरोग्यमंत्र्यांची स्वाईन फ्लूच्या वॉर्डाकडे पाठनागपूरसह संपूर्ण राज्यात स्वाईन फ्लूची साथ अजूनही नियंत्रणात येत नसल्याचे चित्र आहे. राज्यात सर्वात जास्त रुग्ण मेडिकलच्या स्वाईन फ्लू वॉर्डात आहे. विशेष म्हणजे, गुरुवारी सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत मेडिकलमध्ये आले. बैठक घेतली. परंतु स्वाईन फ्लू वॉर्डाला भेट न देताच निघून गेले. यामुळे आरोग्य विभागाच्या वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या खात्याकडून ते वॉर्डाची पाहणी करणार आहे, अशा सूचना मिळाल्या होत्या. त्या दृष्टीने तयारी करून ठेवण्यात आल्याची माहिती आहे.