राज्यात ६७८ पॉझिटिव्ह रुग्ण

By Admin | Updated: February 20, 2015 01:10 IST2015-02-20T01:10:01+5:302015-02-20T01:10:01+5:30

-दीपक सावंत : स्वाईन फ्लू चाचणी शुल्क अर्ध्यावर आणणार

678 positive patients in the state | राज्यात ६७८ पॉझिटिव्ह रुग्ण

राज्यात ६७८ पॉझिटिव्ह रुग्ण

-द
ीपक सावंत : स्वाईन फ्लू चाचणी शुल्क अर्ध्यावर आणणार

(फोटो रॅपमध्ये आहे- रविभवनात स्वाईन फ्लू विषयी माहिती देताना सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री डॉ. दीपक सावंत, सोबत डॉ. सतीश पवार, डॉ. संजय जयस्वाल व डॉ. योगेंद्र सवाई.

नागपूर : राज्यात स्वाईन फ्लूचे आतापर्यंत ६७८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून ८३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजार नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. विशेष म्हणजे, मुंबईच्या धर्तीवर पुणे आणि नागपूरमधील स्वाईन फ्लू नमुन्याचे खासगी तपासणीचे शुल्क अर्ध्यावर आणण्याचा प्रयत्न आहे, सोबतच ५० पेक्षा जास्त खाटा असणाऱ्या खासगी इस्पितळांमध्ये स्वाईन फ्लूच्या रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्याचे व रुग्णाचे आर्थिक शोषण करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती, सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी गुरुवारी दिली.
स्वाईन फ्लूवर घेण्यात आलेल्या आढावा बैठकीनंतर ते रविभवनात पत्रकारांशी बोलत होते.
डॉ. सावंत म्हणाले, जानेवारी ते आतापर्यंत राज्यात ९७ हजार २४८ रुग्णांची तपासणी करण्यात आली. यात स्वाईन फ्लूचे ६ हजार ८८६ संशयित रुग्णांना टॅमी फ्लूचे औषध देण्यात आले. महाराष्ट्रात उपचार घेत असताना इतर राज्यातील नऊ रुग्णांचा मृत्यू झाला. यात मध्य प्रदेशातील सहा, गुजरातमधील एक, आंध्र प्रदेशातील एक आणि उत्तर प्रदेशातील एक रुग्णांची नोंद आहे. राज्यात सध्याच्या घडीला २०५ रुग्ण भरती आहेत. यातील ४० रुग्णांची स्थिती गंभीर असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. ११७ रुग्णांवर यशस्वी उपचार करून घरी पाठविण्यात आले आहे.
-खासगी हॉस्पिटल्समध्येही स्वतंत्र वॉर्ड
५० पेक्षा जास्त खाटा असणाऱ्या इस्पितळांनी स्वाईन फ्लूच्या रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष तयार करावा. ज्या कक्षामध्ये वातानुकूलित यंत्र नसतील किंवा तूर्तास लावणे अशक्य असेल तर अशा इस्पितळांनी कक्षाची दारे-खिडक्या उघडे ठेवून उपचार करावा. विशेष म्हणजे, स्वाईन फ्लू रुग्णाचे आर्थिक शोषण होत असल्याची तक्रार आल्यास गंभीर कारवाई करण्यात येईल.
आढावा बैठकीला शहरातील मोठ्या इस्पितळांचे प्रतिनिधी, मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, सार्वजनिक आरोग्य विभागाचे संचालक डॉ. सतीश पवार, अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे, आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेंद्र सवाई आदी उपस्थित होते.

Web Title: 678 positive patients in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.