शहरं
Join us  
Trending Stories
1
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
2
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
3
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
4
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
5
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
6
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
7
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
8
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
9
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
10
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
11
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
12
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
13
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
14
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
15
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
16
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
17
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
18
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
19
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
20
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान

कांदा आणि लसणाच्या सालीचे होतात हे जबरदस्त फायदे, वाचून व्हाल अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2024 15:38 IST

Onion and Garlic Peels Body Benefits: बऱ्याच लोकांना हे माहीत नसतं की, कांदा आणि लसणाच्या सालीचे आरोग्य, त्वचेला अनेक फायदे होतात.

Onion and Garlic Peels Body Benefits: भारतीय स्वयंपाक घरांमध्ये कांदा आणि लसणाचा रोज वेगवेगळ्या पदार्थांमध्ये वापर केला जातो. वेगवेगळ्या पदार्थांची टेस्ट वाढवण्याचं काम कांद आणि लसूण करतं. काही लोक तर कांदा कच्चाही खातात. सामान्यपणे लोक कांदा आणि लसणाच्या साली फेकून देतात. बऱ्याच लोकांना हे माहीत नसतं की, कांदा आणि लसणाच्या सालीचे आरोग्यालाही, त्वचेला अनेक फायदे होतात.

झाडांसाठी खत

कांदा आणि लसणाच्या सालींचा वापर तुम्ही झाडांसाठी खत म्हणूनही करू शकता. यांपासून तयार केलेलं खत झाडांसाठी चांगलं मानलं जातं. कांदा आणि लसणाच्या सालीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शिअम, आयर्न आणि मॅग्नेशिअम तसेच कॉपर असतं. यामुळे झाडे हिरवीगार होतात आणि वाढही वेगाने होते.

केस होतात चमकदार 

कांद्याच्या सालीने केस चमकदार होतात. कांद्याची साल पाण्यात उकडून हे पाणी केस धुण्यासाठी वापरा. याने केस चमकदार होतात. तेच यांचा वापर डोक्याचे केस रंगवण्यासाठीही केला जातो. कांद्याची साल 1 तास पाण्यात उकडून घ्या. या पाण्याने डोक्याची हलकी मालिश करा. नंतर अर्ध्या तासाने केस धुवा.

क्रॅम्पची समस्या होते दूर

अनेकदा शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांमध्ये क्रॅम्प येतो. याने लोकांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो. अशात कांद्याची साल पाण्यात 10 ते 15 मिनिटे भिजवून ठेवा. रात्री झोपण्याआधी हे पाणी प्या. याने मसल्स क्रॅम्पची समस्या दूर होण्यास मदत मिळेल.

त्वचेवरील खाज

अनेकदा काही लोकांच्या त्वचेवर खूप खाज येते. यासाठी ते अनेक प्रकारच्या औषधांचा वापरही करतात. पण घरीच कांदे आणि लसणाच्या सालीने ही समस्या लगेच दूर केली जाऊ शकते. पाण्यात भिजवून ठेवलेली कांद्याची आणि लसणाची साल शरीरावर खाज आहे तिथे लावा. याने बराच आराम मिळेल.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य