शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

लिव्हरमध्ये काही समस्या होऊ नये यासाठी करा हे सोपे उपाय, डॉक्टरकडे जाण्याची येणार नाही वेळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2024 10:24 IST

लिव्हरच्या मदतीनेच शरीरातील इतर अवयव व्यवस्थितपणे आपलं काम करू शकतात.

लिव्हर आपल्या शरीरातील महत्वाचा अवयव आहे. जर ज्यात काही बिघाड झाला तर वेगवेगळ्या समस्या होतात. ही समस्या लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना होऊ शकते. लिव्हरच्या मदतीनेच शरीरातील इतर अवयव व्यवस्थितपणे आपलं काम करू शकतात. पण लिव्हरची काही समस्या असेल तर याची लक्षणे लवकर बघायला मिळत नाहीत. 

लिव्हरसंबंधी समस्यांची लक्षणे

द हेल्थ साइटने दिलेल्या माहितीनुसार, लिव्हरसंबंधी काही समस्या असेल तर त्याची पुढीलप्रमाणे काही प्रमुख लक्षणे बघायला मिळतात. जसे की, डोळ्यांचा पिवळेपणा, लघवीचा रंग अधिक पिवळा होणे, भूक न लागणे, मळमळ होणे, पायांवर सूज आणि वजन कमी होणे. शंभरपेक्षा अधिक असे आजार आहेत, ज्यांचा प्रभाव लिव्हरवर पडतो. जर तुम्हाला पोटाच्या आजूबाजूला सूज, पायांवर सूज, वजन कमी झाल्याची लक्षणे दिसत असतील तर वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधा.

काही सोपे उपाय

1) प्रत्येक नवजात बाळाला जन्मानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने लगेच हेपेटायटीस बी ची लस द्यायला हवी. 

2) रक्त आणि रक्त उत्पादनांचा वापर करण्याआधी हेपेटायटीस बी आणि सी यांची टेस्ट करावी. टेस्ट करून हे सुनिश्चित करावं की, रक्तात कोणत्या प्रकारचं संक्रमण तर नाही ना.

3) नेहमी स्वच्छ पाणी प्यावे. फळं आणि भाज्यांचं सेवन करण्याआधी त्या स्वच्छ करून घ्या. यात अनेक कीटक किंवा बॅक्टेरिया असतात. ज्यामुळे पोटात अनेक समस्या होऊ शकतात.

4) नवजात बाळांना जर दोन आठवड्यांपेक्षा पीलिया म्हणजेच काविळची समस्या असेल तर वेळीच त्याला लिव्हरसंबंधी काही समस्या नसेल हे चेक करावं. तसेच निदान करून वेळीच उपचार सुरू करावे. जास्तीत जास्त बालकांना जन्मानंतर काविळ होतो, मात्र तो 10 दिवसात ठीक होतो.

5) लिव्हरच्या जास्तीत जास्त आजारांमध्ये जर सुरूवातीलाच योग्य उपचार मिळाले तर परिणाम चांगले होतात. रूग्णाला पुढे होणाऱ्या त्रासापासून आणि लिव्हर ट्रान्सप्लांटेशनपासून वाचवलं जाऊ शकतं.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य