शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

किडनी खराब झाल्यावर सकाळी दिसतात 'ही' ५ लक्षणं, दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2024 11:00 IST

Kidney Problem Symptoms : अनेकदा किडनीमध्ये गडबड झाल्यावर मुख्यपणे सकाळी काही लक्षणे दिसतात. आज आम्ही अशाच पाच लक्षणांबाबत तुम्हाला सांगणार आहोत.

Kidney Problem Symptoms : किडनी शरीरातील महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. किडनीच्या माध्यमातून शरीरातील वेस्टेज किंवा विषारी पदार्थ बाहेर काढले जातात. तसेच किडनींद्वारे रक्त फिल्टर करण्याचं देखील काम होतं. अशात किडनीचं आरोग्य चांगलं ठेवणं फार महत्वाचं ठरतं. 

त्यामुळे किडनीमध्ये कोणतीही समस्या झाली तर ती ओळखणं आणि त्यावर लगेच उपचार करणं गरजेचं असतं. अनेकदा किडनीमध्ये गडबड झाल्यावर मुख्यपणे सकाळी काही लक्षणे दिसतात. आज आम्ही अशाच पाच लक्षणांबाबत तुम्हाला सांगणार आहोत.

सकाळी थकवा आणि कमजोरी

जर तुम्ही सकाळी झोपेतून उठल्यावर थकवा आणि कमजोरी जाणवत असेल तर हा एक गंभीर संकेत असू शकतो. किडनीच्या समस्येमुळे शरीरात टॉक्सिन जमा होऊ लागतात, ज्यामुळे सकाळी झोपेतून उठल्यावर नेहमीच थकवा जाणवतो.

लघवीमध्ये बदल

सकाळी सकाळी लघवीचा रंग आणि प्रमाण तुमच्या किडनी हेल्थचा महत्वाचा संकेत होऊ शकतो. जर लघवीचा रंग फार जास्त डार्क पिवळा असेल, लघवीतून फेस तयार होत असेल, पुन्हा पुन्हा लघवी लागत असेल तर हा किडनीच्या समस्येचा संकेत असू शकतो.

पोटात मुरडा येणे

सकाळी झोपेतून उठताना पोटात सूज किंवा मुरडा येत असेल तर हा किडनी योग्यपणे काम करत नसल्याचा संकेत असू शकतो.

जास्त तहान लागणे

जर सकाळी झोपेतून उठल्यावर तुम्हाला जास्त तहान लागत असेल, तर हाही एक संकेत असू शकतो. किडनीची समस्या झाल्याने शरीरातील पाण्याचं संतुलन बिघडतं. ज्यामुळे तुम्हाला अधिक तहान लागते.

त्वचेमध्ये खाज

किडनीची समस्या असल्याने शरीरात टॉक्सिन जमा होऊ लागतात. ज्यामुळे त्वचेवर खाज, रॅशेज आणि इतरही समस्या होऊ लागतात. सकाळी झोपेतून उठल्यावर तुम्हाला त्वचेवर खास येत असेल तर याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य