शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

अंडरगारमेंट्समुळे होतात हे ५ गंभीर आजार, अशी घ्या काळजी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 11:45 IST

पावसाच्या दिवसात तर ही समस्या सर्रास बघायला मिळते. महिलांना तर या समस्येबाबत नेहमी जागरुक असावे. चला जाणून घेऊ काय होऊ शकतात याचे नुकसान...

अंडरगारमेंट्सचा विषय निघाला की, सर्वांचं लक्ष आधी महिलांकडे जातं. घरातही महिला आपल्या अंडरगारमेंट्सबाबत घाबरलेल्या, लाजताना दिसतात. त्यामुळेच काही महिला या आपले अंडरगारमेंट्स खुल्या जागेत आणि उन्हात वाळत घालून शकत नाहीत. पण अंडरगारमेंट्सबाबत अनेकजण फारसे गंभीर बघायला मिळत नाहीत. जर अंडरगारमेंट्स चांगल्याप्रकारे सुकले नाही तर त्यामुळे वेगवेगळ्या आजारांना निमंत्रण मिळतं. पावसाच्या दिवसात तर ही समस्या सर्रास बघायला मिळते. महिलांना तर या समस्येबाबत नेहमी जागरुक असावे. चला जाणून घेऊ काय होऊ शकतात याने नुकसान...

यूरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन

सामान्यता ही लघवीमुळे होणारी समस्या असते पण याचं मुख्य कारण हायजीन असतं. जर तुमचे अंडरगारमेंट्स चांगल्या प्रकारे स्वच्छ आणि सुकलेले नसतील तर यूटीआय होण्याचा धोका असतो. बॅक्टेरियामुळे होणारा हा आजार फारच धोकादायक असतो. यापासून वाचण्यासाठी अंडरगारमेंट्स चांगल्याप्रकारे स्वच्छ करा आणि उन्हामध्ये वाळत घाला. 

गर्भाशयात इन्फेक्शन

महिलांना नेहमीच वेगवेगळ्या गोष्टींमधून इन्फेक्शनची भीती असते त्यामुळे त्यांना सतत काळजी घ्यावी लागते. महिलांच्या प्रायव्हेट पार्टमध्ये होणारं इन्फेक्शन गर्भाशयामध्ये कोणत्याही रोगाला जन्म देऊ शकतं. हे फार घातक ठरु शकतं. 

स्कीन इन्फेक्शन

स्कीनमध्ये संक्रमण होण्याचं मुख्य कारण हायजीनची कमतरता असतं. जर कपडे पूर्णपणे सुकलेले नसतील ते थोडे ओले असतील तर इन्फेक्शनचा धोका वाढतो. प्रायव्हेट पार्टच्या आजूबाजूचू स्कीन फार सॉफ्ट आणि सेन्सिटीव्ह असते त्यामुळे इथे इन्फेक्शनची भीती जास्त असते. 

खाज येणे

स्कीनच्या आजारांमध्ये खाज येणे ही समस्या सर्वात खराब मानली जाते. एकदा खाज कुणाला झाली तर ती बरी होण्यास बराच वेळ घेते. याव्यतिरिक्त खाज ही एका जागेवरुन दुसऱ्या जागेवर वेगाने पसरते.

किडनी स्टोन

तुम्हाला हे वाचून धक्का बसेल पण अंडरगारमेंट्समुळे किडनी स्टोन होण्याची शक्यताही असते. पण यामागचं कारण बॅक्टेरिया असतं. बॅक्टेरियामुळे इन्फेक्शन झाल्यास सर्वात पहिले ते लिव्हर आणि किडनीला कचाट्यात घेतं. त्यामुळे किडनी स्टोन होण्याची शक्यता असते.  

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स