स्वाईन फ्लूचा ३९वा बळी
By Admin | Updated: February 21, 2015 00:50 IST2015-02-21T00:50:53+5:302015-02-21T00:50:53+5:30
स्वाईन फ्लूचा ३९वा बळी

स्वाईन फ्लूचा ३९वा बळी
स वाईन फ्लूचा ३९वा बळी-चिमुरड्यांमध्ये वाढतोय आजार : स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या १८८(स्वाईन फ्लूचा लोगो घ्यावा)नागपूर : स्वाईन फ्लू बळीची संख्या वाढतच आहे. शुक्रवारी आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाला. आज मिळालेल्या स्वाईन फ्लूच्या अहवालात तीन महिन्यांच्या बाळांसह पाच वर्षाच्या आतील चार बालकांना स्वाईन असल्याचे निष्पन्न झाले आहे. चिमुरड्यांमध्ये स्वाईन फ्लूची लागण वाढल्यामुळे वैद्यकीय वर्तुळात चिंतेचे वातावरण आहे. सुनील कोटकर (४२) रा. विश्वकर्मानगर, असे मृताचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुनील कोटकर हे एका खासगी इस्पितळात उपचार घेत होते. एआरएल लॅबमधून त्यांचा अहवाल पॉझिटीव्ह येताच त्यांना १४ फेब्रुवारी रोजी मेडिकलमध्ये भरती करण्यात आले. सुरुवातीपासून त्यांची प्रकृती गंभीर होती. आज दुपारी १ वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. कोटकर यांच्या मृत्यूने बळीची संख्या ३९ झाली आहे. मेडिकलने पाठविलेल्या २१ संशयित रुग्णांचे नमुन्यांचा अहवाल शुक्रवारी मिळाला. यात सात रुग्णांना स्वाईन फ्लू असल्याचे निष्पन्न झाले. यात तीन महिने, दोन वर्षे, तीन वर्षे आणि चार वर्षांच्या चिमुकल्यांचा समावेश आहे. तर १७, २५ व ४५ वर्षीय पुरुषांचा समावेश आहे. हे रुग्ण, नागपूर, कळमेश्वर, साकोली आणि मध्यप्रदेशातील आहे. मेडिकलच्या स्वाईन फ्लू वॉर्डात सध्याच्या स्थितीत चार पॉझिटीव्ह तर १६ संशयित रुग्ण उपचार घेत आहेत. स्वाईन फ्लूच्या बालरोग वॉर्डात सहा पॉझिटीव्ह तर तीन संशयित रुग्ण उपचार घेत आहेत. -विभागात १८८ रुग्ण शहरात आतापर्यंत स्वाईन फ्लूचे १३३ रुग्ण पॉझिटीव्ह आले आहेत. या शिवाय नरखेड येथून दोन, उमरेड तीन, काटोल एक व कामठी एक असे मिळून आठ रुग्ण, इतर जिल्ह्यातील १६, अकोला येथील तीन, मध्यप्रदेशातील १६, आंध्रप्रदेशातील एक असे मिळून नागपूर विभागात स्वाईन फ्लू रुग्णांची संख्या १८८ झाली आहे.-शहरात २२ रुग्णांचा मृत्यूशहरात आतापर्यंत २२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ग्रामीणमध्ये पाच, इतर जिल्ह्यामंध्ये सहा, नागपूर विभागाच्या बाहेरून येथे उपचारासाठी आलेली परंतु मृत्यू झालेली दोन, इतर राज्यातील चार असे एकूण ३९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.