दुर्बिणीद्वारे पित्ताशयाच्या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे तीन वर्षीय चिमुकलीला मिळाले जीवदान उल्हास पाटील रुग्णालयात शस्त्रक्रिया : शिशु शल्यचिकित्सकांसह टिमचे यश
By Admin | Updated: March 13, 2016 00:05 IST2016-03-13T00:05:23+5:302016-03-13T00:05:23+5:30
जळगाव- पित्ताशयातील इन्फेक्शनमुळे त्रस्त झालेल्या तीन वर्षीय चिमुकलीवर दुर्बिणीद्वारे यशस्वी शस्त्रक्रिया झाल्यामुळे तिला जीवदान मिळाले आहे. डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालयात ही दुर्मिळ शस्त्रक्रिया करण्यात शिशु शल्यचिकित्सकांसह टिमच्या प्रयत्नांंना यश आले आहे.

दुर्बिणीद्वारे पित्ताशयाच्या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे तीन वर्षीय चिमुकलीला मिळाले जीवदान उल्हास पाटील रुग्णालयात शस्त्रक्रिया : शिशु शल्यचिकित्सकांसह टिमचे यश
ज गाव- पित्ताशयातील इन्फेक्शनमुळे त्रस्त झालेल्या तीन वर्षीय चिमुकलीवर दुर्बिणीद्वारे यशस्वी शस्त्रक्रिया झाल्यामुळे तिला जीवदान मिळाले आहे. डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालयात ही दुर्मिळ शस्त्रक्रिया करण्यात शिशु शल्यचिकित्सकांसह टिमच्या प्रयत्नांंना यश आले आहे.जळगाव येथील रहिवासी असलेल्या प्रवीण सहस्त्रबुद्धे यांच्या तीनवर्षीये मुलीला गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून पोटदुखीचा त्रास होत होता. सुरुवातीला तिच्यावर तात्पुरते उपचार करण्यात आले. मात्र पोटाचे दुखणे अधिकच अस झाल्याने या चिमुकलीला डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. याठिकाणी तिची सिटीस्कॅन तपासणी करण्यात आली. या तपासणीत पित्ताशयामध्ये इन्फेक्शन झाल्याचे निदान झाले. तसेच पित्ताशय १२ सेंमी अंश गाठीच्या रुपात बदलले होते. एकॅल्क्युलम कोलेसिस्टायटीस असे या आजाराचे नाव असून हा आजार ५० वर्षे वयावरील व्यक्तींना याचा संभव असतो. पण अवघ्या तीन वर्षीय मुलीला हा आजार होणे हे अत्यंत दुर्मिळ आहे. कारण यापित्ताशयात गाठी झाल्याने ते शरीरात पसरण्याची शक्यता अधिक असते. रुग्णाचा जीव देखील जाऊ शकतो. अशा परिस्थिीत रुग्णावर शस्त्रक्रिया करणे एकमेव पर्याय असतो. त्यामुळे शिशु शल्यचिकित्सक तथा दुर्बिण शस्त्रक्रिया विशेषज्ञ डॉ.मिलिंद जोशी यांनी या चिमुकलीवर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. ५ मिमि व ३ मिमि इतक्या छोट्या छिद्रांमधून तिचे पित्ताशय काढण्यात शिशु शल्यचिकित्सक दुर्बिण शस्त्रक्रिया विशेषज्ञ डॉ.मिलिंद जोशी यांना यश आले. या शस्त्रक्रियेसाठी भुलतज्ज्ञ डॉ.बी.के.गहलोत, डॉ.महेंद्र मल्थ, पंकज चौधरी,डॉ.ऋतुराज काकड, डॉ.देवेंद्र चौधरी, डॉ.सागर व्यास यांचे सहकार्य मिळाले. या तज्ज्ञ डॉक्टरांच्या टिममुळे तीन वर्षीय चिमुकलीला नवे जीवनदानच मिळाले. तिला विश्रांती साठी लहान बालकांच्या अतिदक्षता विभागात भरती करण्यात आले असून प्रकृतीत झपाट्याने सुधारणा होत आहे. सिस्टर ॲन्जेला, डॉ.ऋतुजा पाटील, डॉ.चांदनी मिश्रा हे तिची देखभाल करीत आहे.