१८० जणांनी केले रक्तदान व्हीएस पँथर्सचा उपक्रम : महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन

By Admin | Updated: December 12, 2014 23:49 IST2014-12-12T23:49:18+5:302014-12-12T23:49:18+5:30

लातूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लातुरात व्हीएस पँथर्स संघटनेच्या वतीने आयोजित शिबिरात १८० जणांनी रक्तदान करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शुक्रवारी अभिवादन केले.

180 donations made by blood donation VS Panthers: Greetings on the occasion of Mahaparinirvana | १८० जणांनी केले रक्तदान व्हीएस पँथर्सचा उपक्रम : महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन

१८० जणांनी केले रक्तदान व्हीएस पँथर्सचा उपक्रम : महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन

तूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लातुरात व्हीएस पँथर्स संघटनेच्या वतीने आयोजित शिबिरात १८० जणांनी रक्तदान करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शुक्रवारी अभिवादन केले.
शिबिराचे उद्घाटन समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त संजय दाणी यांच्या हस्ते झाले. महापौर अख्तर शेख, उपमहापौर कैलास कांबळे, काँग्रेसचे नेते अभिजीत देशमुख, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील यादव, डॉ. अजय ओव्हळ, नगरसेवक नवनाथ आल्टे, ॲड.बी.एल. शिंदे, पँथर्स संघटनेचे अध्यक्ष विनोद खटके यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी महापौर अख्तर शेख म्हणाले, रक्तदान हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. एखाद्याचे प्राण वाचविण्यासाठी रक्तदान हे महत्वाचे ठरते. त्यामुळे तरुणांनी रक्तदान करायला हवे. यावेळी काँग्रेसचे नेते अभिजीत देशमुख यांच्यासह १८० जणांनी रक्तदान केले.
प्रारंभी स्वागताध्यक्ष विनोद खटके व सचिन मस्के यांनी उपस्थितांचे स्वागत केले. याप्रसंगी माजी समाजकल्याण सभापती संतोष सूर्यवंशी, सचिन बंडापल्ले, लाला सुरवसे, पुनित पाटील, अमोल कांबळे यांची उपस्थिती होती. शिबिराच्या यशस्वितेसाठी रवि कांबळे, उमेश गायकवाड, आकाश इंगोले, संतोष माने, सौदागर चव्हाण, व्यंकटेश मारकंडे, बाळू गायकवाड, संदेश शिंदे, राजू देशमुख, संदीप सूर्यवंशी, गोपाळ कांबळे, निलेश कांबळे यांच्यासह संघटनेच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Web Title: 180 donations made by blood donation VS Panthers: Greetings on the occasion of Mahaparinirvana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.