दंत महाविद्यालयाच्या बीडीएसच्या १७ जागा रिक्त
By Admin | Updated: December 20, 2014 22:28 IST2014-12-20T22:28:15+5:302014-12-20T22:28:15+5:30
दंत महाविद्यालयाच्या बीडीएसच्या १७ जागा रिक्त

दंत महाविद्यालयाच्या बीडीएसच्या १७ जागा रिक्त
द त महाविद्यालयाच्या बीडीएसच्या १७ जागा रिक्त-मागील तीन वर्षांपासून हीच स्थिती : प्रवेश प्रक्रियेच्या घोळामुळे विद्यार्थ्यांना फटकानागपूर : वैद्यकीय प्रवेशासाठीच्या राष्ट्रीय प्रवेश परीक्षेतून (एनईटी) महाराष्ट्र बाहेर पडेल आणि यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना अतिरिक्त जागा उपलब्ध होतील, अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दोन दिवसांपूर्वी विधानसभेत दिली. परंतु अनेक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या पूर्ण जागाच भरल्या जात नसल्याची धक्कादायक माहिती आहे. विशेष म्हणजे, नागपूर शासकीय दंत महाविद्यालयात या वर्षी ५० जागांसाठी फक्त ३३ जागाच भरण्यात आल्या आहेत. हीच स्थिती मागील तीन वर्षांपासून आहे. दंत महाविद्यालयाच्या बीडीएस (बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी) विषयात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आणि जागा कमी राहत असल्याने २०१३ मध्ये भारतीय दंत परिषदेने (डीसीआय) वाढीव दहा जागेला मंजुरी दिली. ४० वरून या जागा ५० झाल्या. या जागा भरण्यासाठी लागणारा वेळ लक्षात घेऊन शासकीय दंत महाविद्यालय जून महिन्यापासून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होते. मात्र, सेंट्रल ॲडमिशनच्या प्रवेश प्रक्रियेत बराच वेळ जातो. साधारण दीड ते दोन महिन्याचा कालावधी लागतो. याचा परिणाम राज्याच्या प्रवेशप्रक्रियाच्या राऊंडवर पडून त्यात बराच विलंब होतो. दुसरीकडे याच काळात खासगी दंत महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झालेली असते. अनेक विद्यार्थी शासकीय महाविद्यालयात नंबर लागणार नाही या शंकेने खासगी महाविद्यालयात भरमसाट पैसे भरुन प्रवेश निश्चित करतात. शेवटच्या घटकेला जेव्हा शासकीय महाविद्यालयांमध्ये जागा रिक्त आहे अशी माहिती मिळाल्यावर त्यांना वेळेवर जमा केलेले पैसे किंवा डाक्युमेंट मिळत नाही. यातच सुप्रीम कोर्टाने ३० सप्टेंबर शेवटची तारीख ठरवून दिल्याने या तारखेपर्यंत दंत महाविद्यालयाच्या पूर्ण जागाच भरल्याच जात नाही. मागील दोन वर्षांपासून हीच स्थिती असल्याने याचा फटका विशेषत: गरीब विद्यार्थ्यांना बसत आहे.