पाच वर्षांत अपघातात १,४३३ जणांचा मृत्यू

By Admin | Updated: February 13, 2015 00:38 IST2015-02-13T00:38:07+5:302015-02-13T00:38:07+5:30

पाच वर्षांत अपघातात १,४३३ जणांचा मृत्यू

1,433 deaths in road accidents in five years | पाच वर्षांत अपघातात १,४३३ जणांचा मृत्यू

पाच वर्षांत अपघातात १,४३३ जणांचा मृत्यू

च वर्षांत अपघातात १,४३३ जणांचा मृत्यू
-गेल्या वर्षांत १,१५१ अपघात : २८१ जणांचा मृत्यू
( माहितीच्या अधिकारातील लोगो वापरावा)
नागपूर : भारतात दररोज सरासरी २५० माणसे वाहन अपघातात मृत्युमुखी पडतात. ७०० व्यक्ती रोज जखमी अथवा कायमचे अपंग होतात. शहराचा विचार केल्यास गेल्या वर्षात १,१५१ अपघात झाले असून, यात २८१ जणांचा मृत्यू झाला आहे. मागील पाच वर्षांत झालेल्या ६,२५५ अपघातात १,४३३ जणांचा मृत्यू झाला आहे. ही संख्या कोणत्याही प्रकाराच्या आजाराने किंवा नैसर्गिक आपत्तीने होणाऱ्या जीवहानीपेक्षाही मोठी आहे. सामाजिक कार्यकर्ता अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारात ही माहिती मागितली असता ही धक्कादायक बाब समोर आली आहे.
शहरात होणाऱ्या एकूण अपघातांपैकी ७० ते ८० टक्के अपघात केवळ मानवी चुकांमुळे होतात. ते निश्चितच टाळता येतात. असे असतानाही रस्ता वापरणाऱ्या घटकांनी याबाबत गंभीरपणे दखल घेतल्याचे दिसत नाही. वाढत्या शहरीकरणामुळे मुख्य रस्तेच नाही तर वसाहतीमधील रस्त्यांवरील वाहतूक समस्या बिकट होत चालली आहे. रस्त्यांची दुरवस्था, वाहनांच्या संख्येत झालेली प्रचंड वाढ व शिस्तीचा अभाव यामुळे जलद आणि सुरक्षित प्रवास करणे कठीण झाले आहे. यातच पार्किंगच्या जागा मर्यादित असल्याने व रस्त्यावरील अतिक्र मण व फेरीवाले यामुळे ही परिस्थिती अधिकच अवघड झाली आहे; शिवाय प्रदूषणामुळे आरोग्यावरही परिणाम होऊ लागला आहे.
- सर्वात जास्त अपघात पूर्व तर मृत्यू उत्तरमध्ये
१ जानेवारी २०१० ते ३१ डिसेंबर २०१४ या वर्षात पूर्व वाहतूक शाखेत १,३८७ अपघात झाले आहेत. पश्चिम, उत्तर, दक्षिण, इंदोरा, एमआयडीसी या वाहतूक शाखेच्या तुलनेत पूर्वमध्ये सर्वात जास्त अपघात झाले आहेत, तर उत्तर वाहतूक शाखेंतर्गत सर्वात जास्त मृत्यू झाले आहेत. मृत्यूचा हा आकडा ३२३ वर गेला आहे.

Web Title: 1,433 deaths in road accidents in five years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.