जि़प़च्या ११३ शाळेतील ९४ पदे रिक्त

By Admin | Updated: June 12, 2015 17:37 IST2015-06-12T17:37:58+5:302015-06-12T17:37:58+5:30

हिमायतनगर : हिमायतनगर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ११३ शाळेतील ९४ पदे रिक्त आहेत़ या संदर्भात शिक्षण विभाग समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत़

Of the 113 schools in JEE, 9 4 posts are vacant | जि़प़च्या ११३ शाळेतील ९४ पदे रिक्त

जि़प़च्या ११३ शाळेतील ९४ पदे रिक्त

मायतनगर : हिमायतनगर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ११३ शाळेतील ९४ पदे रिक्त आहेत़ या संदर्भात शिक्षण विभाग समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत़
तालुक्यातील ८ केंद्रात १० हजार ६६२ विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पहिली ते आठवीची पुस्तके मिळणार आहेत़ तालुक्यात मराठी, इंग्रजी व उर्दू माध्यमाच्या १७ खाजगी शाळा आहेत़ तालुक्यात पदोन्नत मुख्याध्यापकांची ५, शिक्षण विस्तार अधिकारी २, प्राथमिक शिक्षक १६, पदविधर शिक्षक ६७, केंद्रप्रमुखांची चार अशी एकूण ९४ पदे रिक्त आहेत़ चालू शैक्षणिक वर्षात डॉ़बाबासाहेब आंबेडकर गुणवत्ता अभियान जिल्‘ात राबविले जाणार आहे़ जि़प़च्या वतीने १५ ते २९ जूनपर्यंत पटनोंदणी जागृती अभियान राबविल्या जाणार असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी सूरदुजे यांनी दिली़ यावेळी बीडीओ विलास गंगावने उपस्थित होते़

शंकर गायकवाड यांना निरोप
मांजरम : मौजे बेटमोगरा टाकळी येथील पशूवैद्यकीय दवाखान्यातील सेवक शंकर गायकवाड सेवानिवृत्त झाल्याने त्यांना निरोप देण्यात आला़ यावेळी विस्तार अधिकारी डॉ़बिराजदार, सहाय्यक आयुक्त डॉ़अरविंद गायकवाड, डॉ़धोतरे, इतर पशूधन अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते़

१०८ क्रमांकाची रुग्णवाहिका असून अडचण नसून खोळंबा
किनवट : गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयासाठी असलेली १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका सध्या रुग्णांच्या डोकेदुखीचा विषय बनली आहे़ कधी डॉक्टर अनुपस्थित तर कधी रुग्णवाहिका उपलब्ध नसणे आदी बाबींमुळे रुग्ण वैतागले आहेत़
२८ मे रोजी किनवट येथील प्रेमिलाबाई किशन नेम्मानीवार यांना अर्धांगवायूचा झटका आला होता़ सकाळी ७़३० वाजता त्यांना गोकुंदाच्या उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले़ तेथील डॉक्टरांनी नांदेडला हलविण्याचा सल्ला दिला़ याच रुगणालयाच्या नावे तीन रुग्णवाहिका असूनही एकही मिळाली नाही़ १०८ क्रमांकाच्या गाडीचा चालक उपलब्ध होते़ मात्र डॉक्टर नाही, असे सांगून संबंधितांनी हात वर केले़ तेव्हा खाजगी गाडीने प्रेमिलाबाई यांना नांदेडला पाठवावे लागले़
अति कठीण काळात उपयोग होत नसेल तर १०८ क्रमांकाची गाडी काय कामाची असा प्रश्न नातेवाईक विचारत आहेत़ याशिवाय गाडी कंपाऊंडच्या बाहेर लावली जाते़ दर्शनी भागात ती न ठेवता अडगळीच्या जागेत ठेवली जाते़ कधी टेक्नीकल प्रॉब्लेम, कधी गाडी उपलब्ध नसणे असे प्रकार रुग्णांच्या जिवाशी खेळणारे असल्याच्या प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत़ १०८ गाडीविषयीची तक्रार ९ जून रोजी मजविपचे जिल्हाध्यक्ष तथा गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयाचे रुग्णकल्याण समिती सदस्य गंगन्ना नेम्मानीवार यांनी केली़ प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ़विकास जाधव यांनीही पुणे येथील तक्रार कक्षात १०८ ची सेवा योग्य पद्धतीने मिळत नसल्याचे सांगितले़

Web Title: Of the 113 schools in JEE, 9 4 posts are vacant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.