०९... तारसा... कांजण्या
By Admin | Updated: February 10, 2015 00:56 IST2015-02-10T00:56:07+5:302015-02-10T00:56:07+5:30
मोहाडी येथे कांजण्याची लागण

०९... तारसा... कांजण्या
म हाडी येथे कांजण्याची लागण३२ रुण आढळले : पालकांमध्ये भीतीचे वातावरण तारसा : मौदा तालुक्यातील मोहाडी येथे कांजण्या या आजाराची लागण झाली असून, तिथे ३२ रुग्ण आढळून आल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. हा आजार सहसा लहान मुलांना होत असल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा आजार वातावरणातील प्रतिकूल बदलामुळे उद्भवला असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. यात लहान मुलांना सुरुवातीला ताप येतो. त्यानंतर चेहरा व अंगावर पुरळ यायला सुरुवात होते. या आजारामुळे मुलांच्या शरीरावर छोटेछोटे काळे डाग तयार होत असल्याने तसेच हा आजार वाढत असल्याने पालक चिंतेत आहे. हा आजार संसर्गजन्य असल्याने सदर रुग्ण बालकांना किमान सात दिवस सार्वजनिक स्थळी नेण्याचे किंवा शाळेत पाठविण्याचे कटाक्षाने टाळावे, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. हा आजार बरा होण्यासाठी आठवडाभराचा काळ लागत असल्याचे जाणकारांनी सांगितले. मोहाडी येथे कांजण्याची लागण झाल्याचे कळताच मौदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. सावळीकर, डॉ. वैतागे, टेंभुर्णे, अंबादे, रामटेके, पुनवटकर आदींनी मोहाडी गावाला भेट देऊन रुग्णांची पाहणी केली. या सर्व रुग्णांवर औषधोपचार सुरू असल्याची माहितीही डॉक्टरांनी दिली. (वार्तरहर)***