शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या ३० जागांसाठी निवडणूक १८ जानेवारीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2021 15:42 IST

निवडणूक आयोगाने ओबीसी प्रवर्गातील जागा खुल्या करुन त्यासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे २१ डिसेंबरला जि.प.च्या ४३ तर पंचायत समितीच्या ८६ जागांसाठी निवडणूक होणार असून मतमोजणी १९ जानेवारीला होणार आहे.

ठळक मुद्देसर्व जागांची एकत्रित होणार मतमोजणीराज्य निवडणूक आयोगाचे आदेश

गोंदिया : स्थानिक स्वराज्य संस्थामधील २७ टक्के ओबीसी आरक्षणाला सर्वाेच्च न्यायालयाने स्थगिती दिली. त्यामुळे ओबीसी प्रवर्गाच्या जागा आता खुल्या करुन या जागांसाठी १८ जानेवारीला निवडणूक घेण्यात येणार आहे. यासंबंधीचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी (दि. १७) काढले आहे. त्यामुळे आता सर्वच जागांची मतमोजणी १९ जानेवारीला होणार आहे.

जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक २१ डिसेंबरला जाहीर झाली होती. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या ५३ व पंचायत समितीच्या १०६ जागांसाठी निवडणूक होणार होती. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थामधील २७ टक्के ओबीसी आरक्षणाला स्थगिती दिल्याने ओबीसी प्रवर्गाच्या एकूण ३० जागा वगळून उर्वरित जागांसाठी २१ डिसेंबर निवडणूक जाहीर केली होती. उर्वरित ३० जागांसाठी निवडणूक केव्हा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

आज शुक्रवारी निवडणूक आयोगाने ओबीसी प्रवर्गातील जागा खुल्या करुन त्यासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे आता २१ डिसेंबरला जि.प.च्या ४३ तर पंचायत समितीच्या ८६ जागांसाठी निवडणूक होणार आहे. मात्र मतमोजणी आता सर्वच जागांसाठी एकत्रित म्हणजे १९ जानेवारीला होणार आहे.

महिनाभर करावी लागणार मतपेट्यांची सुरक्षा

ओबीसी प्रवर्गाच्या जागा खुल्या करुन त्यासाठी नव्याने निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील जि.प.च्या १० आणि पं.स.च्या २० अशा एकूण ३० ओबीसी प्रवर्गाच्या जागा आता सर्वसाधारण करण्यात आल्या आहे. यासाठी १८ जानेवारीला निवडणूक होणार आहे. मात्र, त्यापूर्वी जाहीर झालेल्या जि.प.च्या ४३ आणि पंचायत समितीच्या ८६ जागांसाठी २१ डिसेंबरला निवडणूक होणार असून मतमोजणी १९ जानेवारीला होणार आहे. त्यामुळे महिनाभर मतपेट्या सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनाची राहणार आहे. .

३० जागांसाठी नव्याने निवडणूक प्रक्रिया

राज्य निवडणूक आयोगाने ओबीसी प्रवर्गाच्या ३० जागा सर्वसाधारण करुन या जागांसाठी १८ जानेवारी रोजी निवडणूक जाहीर केली आहे. या जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासूनची प्रक्रिया पुन्हा नव्याने राबविण्यात येणार आहे. त्यामुळे निवडणूक यंत्रणेवरील ताण पुन्हा वाढला आहे.

त्या उमेदवारांना आर्थिक भुर्दंड

सुरुवातीला ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यासाठी शुल्क देखील भरले होते. पण आता पुन्हा निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यामुळे आधी अर्ज केलेल्या उमेदवारांना आर्थिक भुर्दंड बसला आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकZP Electionजिल्हा परिषदpanchayat samitiपंचायत समितीzpजिल्हा परिषदOBC Reservationओबीसी आरक्षणOBCअन्य मागासवर्गीय जातीSupreme Courtसर्वोच्च न्यायालय