शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

सिव्हिल लाईन्सच्या तरूणांनी सुरू केले पोळी संकलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 05:00 IST

आजच्या स्थिीतीत आता खालसा सेवा दलने शहरातील बाई गंगाबाई महिला रुग्णालय व केटीएस रूग्णालय आणि मनोहर म्युनिसिपल शाळेत थांबविण्यात आलेले गरजू तसेच शहरातील सुमारे १५ खासगी रूग्णालयांतील रूग्णांच्या भोजनाची जबाबदारी घेतली आहे. यामुळे आता खालसा सेवा दलला सुमारे ३ हजार लोकांच्या दोन वेळचे भोजन तसेच दोन वेळच्या चहा-बिस्कीटची व्यवस्था करावी लागत आहे.

ठळक मुद्देप्रत्येक घरातून प्रत्येकी ५ पोळ््या : खालसा सेवा दलला करीत आहेत मदत

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरातील विविध दवाखान्यात अडकून पडलेल्या तसेच येथील म्युनिसीपल शाळेत थांबविण्यात आलेल्या बेघर लोकांच्या भोजनाची जवाबदारी वहन करणाऱ्या खालसा सेवा दलच्या मदतीसाठी सिव्हील लार्ईन्स परिसरातील तरूणही धावून आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज गणेश उत्सव मंडळ तसेच नगर बजरंग दलचे कार्यकर्ते हे तरूण परिसरातील घरांतून पोळ््यांचे संकलन करून खालसा सेवा दलला देत आहेत.सन २०१८ पासून भुकेल्यांना भोजन वितरण करण्याचे कार्य येथील खालसा सेवा दल करीत आहे. आजच्या स्थिीतीत आता खालसा सेवा दलने शहरातील बाई गंगाबाई महिला रुग्णालय व केटीएस रूग्णालय आणि मनोहर म्युनिसिपल शाळेत थांबविण्यात आलेले गरजू तसेच शहरातील सुमारे १५ खासगी रूग्णालयांतील रूग्णांच्या भोजनाची जबाबदारी घेतली आहे. यामुळे आता खालसा सेवा दलला सुमारे ३ हजार लोकांच्या दोन वेळचे भोजन तसेच दोन वेळच्या चहा-बिस्कीटची व्यवस्था करावी लागत आहे. विशेष म्हणजे, सध्या स्थितीत घराबाहेर पडण्यास मनाई असल्याने कित्येकांना त्यांना मदत करण्याची इच्छा असूनही काहीच करता येत नसल्याचे दिसत आहे.अशात फुलचूर येथील जय बम्लेश्वरी कॉलनीतील तरूण पुण्याच्या या कामात आपला हातभार लागावा यासाठी कॉलनीतील सुमारे ५५ घरांतून दररोज सकाळी पोळ््यांचे संलन करीत आहेत. संकलीत करण्यात आलेल्या पोळ््या ते खालसा सेवा दलला देऊन त्यांना हातभार लावत आहेत. गरजूंसाठी आपणही काही करावे हीच इच्छा बाळगून शहरातील सिव्हील लाईन्स परिसरातील शिवाजी चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज गणेश उत्सव मंडळ व नगर बजरंग दलचे कार्यकर्ते पुढे आले आहे.बजरंग दलचे मुंबई क्षेत्र संयोजक देवेश मिश्रा, राजा गिºहे, अंकुश कुलकर्णी, हरीश चेतवानी, विक्की चव्हाण, संदेश मिश्रा,सुरेश तितिरमारे, बुल्ला सोनी व त्र्यबंक जरोदे यांनी खालसा सेवा दलला पोळ््यांच्या स्वरूपात हातभार लावण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर आता शनिवारपासून (दि.२८) हे तरूण परिसरातील सुमारे ३५ घरांतून प्रत्येकी ५ पोळ््या दररोज सकाळी संकलीत करीत असून खालसा सेवा दलला देत आहेत.खालसा सेवा दलकडून सुमारे ३ हजार लोकांना भोजनाची सुविधा केली जात असल्याने त्यांना थोडाफार हातभार लावता यावा हाच यामागचा उद्देश असून आता आणखीही घरे वाढणार असल्याचे देवेश मिश्रा यांनी लोकमतशी बोलतांना सांगीतले.परिसरातील सुरू केले सॅनिटायझेशनकोरोना विषाणूचा नायनाट करण्यासाठी सर्वत्र सॅनिटायझेशनचे काम सुरू आहे. नगर परिषदेने मुख्य चौकांमध्ये सॅनिटायझेशन केले असून आता प्रभागांत अंतर्गत भागातही केले जात आहे. तर काही नगरसेवक तसेच सामाजिक कार्यकर्ते स्वखर्चातून सॅनिटायजेशन करत आहेत. या तरूणांनीही स्वखर्चातून परिसरात सॅनिटायजेशन सुरू केले असून घरोघरी जाऊन हे कार्य केले जात आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसsocial workerसमाजसेवक