शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

गाडी विकत घ्यायला आईचा नकार.. त्याने रागारागात लहान भावाचा केला खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2021 18:09 IST

आमगाव तालुक्याच्या शिवणी येथील मोठ्या भावाने आईने नवीन गाडी विकत घ्यायला नकार दिल्याच्या रागातून मतिमंद असलेल्या लहान भावाचा गळा आवळून खून केला.

गोंदिया : आईने नवीन गाडी विकत घेण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून मुलाने लहान मतिमंद भावाची गळा दाबून खून केला. ही घटना आमगाव तालुक्याच्या शिवणी येथे १७ डिसेंबरच्या पहाटे ५ च्या सुमारास घडली. 

भुवन लक्ष्मण डोये (१९) रा. शिवणी असे मृताचे नाव आहे. हेमंत लक्ष्मण डोये (२३) रा. शिवणी, असे आरोपी भावाचे नाव आहे.  हेमंत हा आपल्या आईला नवीन गाडी घेण्यासाठी पैसे मागत होता. परंतु त्याचा लहान भाऊ भुवन लक्ष्मण डोये हा मतिमंद असल्याने त्याच्या वैद्यकीय खर्चासाठी पैसे लागतात म्हणून आईने त्याला पैसे देण्यास नकार दिला होता.

मतिमंद भावाच्या उपचाराला पैसे लागत असल्याने मला नवीन गाडी मिळत नाही असा राग हेमंतच्या मनात घर करून होता. त्याच्या उपचारासाठी पैसे खूप लागत असल्याने आपल्या इच्छा पूर्ण होत नाही असे गृहित धरून आरोपीने १६ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजता सर्व झोपी गेल्यावर लहान भावाचा गळा आवळून खून केला. १७ डिसेंबर रोजी सकाळी ५ वाजता उठल्यावर हा प्रकार उघडकीस आला. आईच्या तक्रारीवरून आरोपी मुलावर आमगाव पोलिसांनी भादंविच्या कलम ३०२, ५०६ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक नाळे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू