शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

तुमचे नाव कोणत्या मतदान केंद्रावर आहे कळणार एका कॉलवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2024 15:28 IST

Gondia : प्रजित नायर लोकसभेतील चुकीची विधानसभेत पुनरावृत्ती नाही

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : मतदानाच्या दिवशी मतदारांचा वेळेवर गोंधळ उड्डू नये, ते मतदानापासून वंचित राहू नये, लोकसभेत झालेल्या चुकीची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीत होऊ नये याची जिल्हा प्रशासनाने पूर्णपणे काळजी घेतली आहे. तुमचे नाव नेमके कुठल्या मतदान केंद्रावर आहे हे तुम्हाला माहिती नसेल तर गोंधळून जाऊ नका, तुम्ही केवळ तहसील कार्यालयात असलेल्या मतदान केंद्रावर कॉल करा, तुम्हाला लगेच तुमचे नाव कुठल्या मतदान केंद्रावर आहे याची माहिती मिळेल असे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी सोमवारी (दि.१८) येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने येथील उपविभागीय कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक गोरख भामरे उपस्थित होते. जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी माहिती देताना सांगितले की मतदानाच्या ४८ तासांपूर्वी उमेद्वारांना जाहीर प्रचार बंद करावा लागतो. त्याअनुषंगाने गोंदिया आणि तिरोडा मतदारसंघात सायंकाळी ६ वाजता व अर्जुनी मोरगाव व आमगाव मतदारसंघात दुपारी ३ वाजता जाहीर प्रचार बंद करण्यात आला. २० नोव्हेंबरला जिल्ह्यातील चारही मतदारसंघात मतदान होणार आहे. अर्जुनी मोरगाव आणि आमगाव मतदारसंघात सकाळी ७ ते सायंकाळी ६ आणि गोंदिया आणि तिरोडा मतदारसंघात सकाळी ७ ते दुपारी ३ वाजता ही मतदानाची वेळ आहे. मतदान प्रक्रियेदरम्यान मतदान केंद्रावर मतदारांची कुठलीही गैरसोय आहे. सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मतदान केंद्रांवर रांगा लागू नये याची सुद्धा काळजी घेण्यात आली. लाईट्स व तंबूची सुद्धा व्यवस्था करण्यात आली. २० नोव्हेंबरला जिल्ह्यातील जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी केले.

६४५० कर्मचाऱ्यांनी बजाविला पोस्टल बॅलेटद्वारा मतदानाचा अधिकारनिवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी चारही मतदारसंघात साडेसहा हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे कर्मचारी मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू नयेत यासाठी त्यांचे पोस्टल बॅलेट मतदान घेण्यात आले आहे. चारही मतदारसंघात नियुक्त ६४५० कर्मचाऱ्यांनी पोस्टल बॅलेट मतदानाचा हक्क बजाविला असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

११ लाख २५ हजार मतदार बजाविणार मतदानाचा हक्कजिल्ह्यातील चारही मतदारसंघात एकूण ११ लाख २५ हजार १०० मतदार आहेत. २० नोव्हेंबरला सर्व मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा, एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी दोन दिवसांत सर्व मतदारांना मतदान चिकूचांचे वाटप करण्यात आले. तसेच मतदार केंद्रावर आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

मतदारांसाठी विधानसभानिहाय मदत केंद्रअर्जुनी मोरगाव : ०७९६-२२०१४६तिरोडा : ०७१९८-२९९०२०गोंदिया : ०७१८२-२३६७०३आमगाव : ०७१९९-२९५२९६

मध्यप्रदेश, छत्तीसगड पोलिस दलाची मदत विधानसभा निवडणुका शांततापूर्ण वातावरणात पार पडाव्यात या दरम्यान कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिस विभागाने आवश्यक उपाययोजना केल्या आहेत. तसेच लगतच्या छत्तीसगड आणि मध्यप्रदेश पोलिसांची मदत घेण्यात आली आहे. - संवेदनशील मतदान केंद्रावर अतिरिक्त पोलिस जवानांची नियुक्त्ती करण्यात आली असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांनी सांगितले. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४gondiya-acगोंदिया