शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
2
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
3
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
4
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
5
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
6
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
7
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
8
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
9
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
10
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
11
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
12
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
13
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
14
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
15
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
16
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
17
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
18
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
19
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
20
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती

यंदा ४५ टक्के पाऊस कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 00:53 IST

जिल्ह्यात यावर्षी ४ आॅगस्ट पर्यंत केवळ ५५ टक्के पाऊस पडला आहे. कमी पावसामुळे रोवण्या होऊ शकल्या नाही.

ठळक मुद्देशेतकरी चिंतातूर: पीक विम्यासाठी जिल्हाधिकाºयांचे प्रोत्साहन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात यावर्षी ४ आॅगस्ट पर्यंत केवळ ५५ टक्के पाऊस पडला आहे. कमी पावसामुळे रोवण्या होऊ शकल्या नाही. त्यामुळे शेतकरी चिंतातूर आहे. कमी पावसामुळे पिकांच्या उत्पादनावर सुध्दा फरक पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. नैसर्गीक संकटामुळे पिकांचे नुकसान भरपाई व संकटात सापडलेल्या शेतकºयांना मदत देता यावी. यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले होते.जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकºयांनी या पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकºयांना विम्याचा हप्ता भरण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकाºयांनी जिल्ह्यातील ६ तालुक्यांना भेट दिली. पीक विमा योजनेचे अर्ज स्विकारीत असलेल्या ठिकाणी, तहसील कार्यालय, तलाठी कार्यालय व ग्रामपंचायतमध्ये उपस्थित शेतकºयांशी संवाद साधला. पीक विम्याचा हप्ता भरण्यासाठी प्रोत्साहित केले. पिकाचा विमा काढणे किती महत्वाचे आहे, हे शेतकºयांना पटवून दिले.सी.एस.सी. सेंटर, आपले सरकार सेवा केंद्र व संग्राम केंद्र यांना जिल्हाधिकारी काळे यांनी भेट देऊन आॅनलाईन विमा हप्ता भरताना येत असलेल्या अडचणीबाबतची माहिती जाणून घेतली. तहसील कार्यालय गोरेगाव येथील पीक विमा भरण्यासाठी उघडण्यात आलेल्या केंद्राला भेट देवून सोनी, भडंगा व इतर गावातील उपस्थित शेतकºयांशी संवाद साधला. शेतकºयांना विम्याबाबत असलेल्या शंकांचे यावेळी जिल्हाधिकाºयांनी निराकरण केले. या तालुक्यासाठी संपर्क अधिकारी म्हणून नेमलेल्या उपजिल्हाधिकारी शुभांगी आंधळे, तहसीलदार कल्याणकुमार डहाट उपस्थित होते.सडक/अर्जुनी तालुक्यातील परसोडी येथील तलाठी साझा येथे पीक विमा भरण्यासाठी आलेल्या शेतकºयांशी जिल्हाधिकाºयांनी चर्चा केली. त्यानंतर सडक/अर्जुनी येथील सेतू केंद्राला भेट देवून पीक विमा काढण्यासाठी आलेल्या शेतकºयांशी संवाद साधून सेतू केंद्र चालकाला पीक विम्याचा अर्ज आॅनलाईन भरतांना येणाºया अडचणीची माहिती जाणून घेतली. या तालुक्याचे संपर्क अधिकारी म्हणून नेमलेले उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे, तहसीलदार विठ्ठल परळीकर उपस्थित होते. चिखली येथील ग्रामपंचायतमध्ये उपस्थित असलेल्या शेतकºयांशी चर्चा करून ४ आॅगस्ट पर्यंत जास्तीत जास्त शेतकºयांनी आवश्यक ते कागदपत्र सी.एस.सी. व सेतू केंद्राला देवून पीक विम्याचा हप्ता भरण्याचे सांगितले. गावातील शेतकºयांनी यावेळी पिकाची स्थिती अत्यंत बिकट असून येथील शेतकरी धान पिकावरच अवलंबून असल्याचे तसेच पीक विमा काढण्यासाठी संबंधित केंद्रावर एकही अर्ज अपलोड होत नसल्याचे पं.स.सदस्य गिरीधारी हत्तीमारे यांनी सांगितले.अर्जुनी/मोरगाव तालुक्याच्या परसोडी येथील ग्रामपंचायतमध्ये शेतकºयांशी संवाद साधला. नवेगावबांध येथील आपले सरकार आॅनलाईन केंद्राला भेट दिली. यावेळी उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे, तहसिलदार देवदास बोंबार्डे उपस्थित होते.देवरी येथे सुध्दा सेतू केंद्र, आपले सरकार आॅनलाईन केंद्राला भेट दिली. यावेळी तहसीलदार विजय बोरूडे, गटविकास अधिकारी हिरूळकर, कृषि अधिकारी मेश्राम उपस्थित होते. सालेकसा तालुक्यातील साखरीटोला येथे सी.एस.सी. केंद्राला भेट देवून आॅनलाईन किती अर्ज सादर करण्यात आले याबाबतची माहिती घेतली. यावेळी तहसिलदार प्रशांत सांगडे, तालुका कृषि अधिकारी श्री.तोडसाम उपस्थित होते.आमगाव तालुक्यातील ठाणा येथील सी.एस.सी. केंद्राला भेट देवून येणाºया अडचणी जाणून घेतल्या. यावेळी तहसीलदार साहेबराव राठोड उपस्थित होते.जिल्हाधिकारी यांनी पालकमंत्री राजकुमार बडोले व खासदार नाना पटोले यांना पीक विम्याचा आॅनलाईन अर्ज भरतांना येणाºया अडचणीची माहिती दिली. जिल्हाधिकाºयांच्या भेटीमुळे अनेक शेतकºयांना पीक विम्याचा हप्ता भरण्याबाबत प्रोत्साहन मिळाले.