शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

जागतिक स्तरावरील उपचाराची सुविधा गोंदियात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 21:33 IST

देशात सर्वाधिक कॅन्सरचे रुग्ण असणाऱ्या राज्यात महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो. कॅन्सर रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे याचा उपचार घेण्यासाठी रुग्णांना देश आणि विदेशात जावे लागते.

ठळक मुद्देशरद पवार : रिलायन्स कॅन्सर केअर हॉस्पिटलचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : देशात सर्वाधिक कॅन्सरचे रुग्ण असणाऱ्या राज्यात महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो. कॅन्सर रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे याचा उपचार घेण्यासाठी रुग्णांना देश आणि विदेशात जावे लागते. मात्र विदेशात कॅन्सरच्या उपचारासाठी जे आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध आहे तेच महाष्ट्रात रिलायन्सच्या कॅन्सर केअर हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे गोंदियासह या परिसरातील रुग्णांना जागतिक स्तरावरील उपचाराची सुविधा उपलब्ध झाली असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.कोकीळाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटलशी संलग्न असलेल्या रिलायन्स कॅन्सर केअर हॉस्पिटल गोंदिया येथे सुरू करण्यात आले. रविवारी (दि.२३) या हॉस्पिटलच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.या वेळी खा.प्रफुल्ल पटेल, खा.मधुकर कुकडे, अंबानी समुहाच्या टिना अंबानी, आ.गोपालदास अग्रवाल, प्रकाश गजभिये, जि.प.अध्यक्ष सीमा मडावी, माजी मंत्री नाना पंचबुध्दे, अनिल देशमुख, माजी आ.राजेंद्र जैन, अनिल बावनकर, मनोहरभाई पटेल अ‍ॅकडमीच्या अध्यक्ष वर्षा पटेल, अनमोल अंबानी, डॉ.कौस्तव तलपात्रा, रिलायन्स हॉस्पीटलचे कार्यकारी निर्देशक राम नारायण उपस्थित होते.पवार म्हणाले, कॅन्सर या आजारा बद्दल इतरांपेक्षा मला अधिक माहिती आहे. कारण मी स्वत: आजारातून गेलो आहे. जवळपास ३६ वेळा रेडीयशन घेतल्याने आता पूर्णपणे मी बरा आहे. जीवनात वाईट गोष्टींची सवय टाळा, तंबाखू, पान, खर्रा खाऊन नका. कॅन्सर विरुध्द लढा उभारण्याचे आवाहन केले. पटेल म्हणाले, माझ्यासाठी हा कार्यक्रम भावनिक आहे. अंबानी समुहाने गोंदिया येथे दर्जेदार आणि सर्व आधुनिक सोयी सुविधा असणारे कॅन्सर केअर हॉस्पीटल सुरू केल्याने गोंदिया-भंडारा जिल्ह्यांसह लगतच्या मध्यप्रदेश आणि छत्तीसगड येथील रुग्णांना सुध्दा याचा उपयोग होणार आहे. मुंबईपासून हजारो कि.मी.अंतरावर आणि महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर असलेल्या जिल्ह्यात हे हॉस्पीटल सुरू केल्याबद्दल मी टिना अंबानी यांचा आभारी आहे. अलीकडे कॅन्सरवरील उपलब्ध उपचार पध्दती हे या क्षेत्रातील क्रांती आहे. अंबानी समुहाने गोंदिया येथे कोकीळाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पीटलच्या धर्तीवर पुन्हा एक हॉस्पीटल उभारण्याचा आग्रह टिना अंबानी यांच्याकडे धरला.टिना अंबानी म्हणाले काही कार्यक्रमाच्या निमित्ताने गोंदिया येथे आले होते. तेव्हा विमानातून या शहराचे सौंदर्य पाहुन मी शहराच्या प्रेमात पडले आणि तेव्हाच येथे कॅन्सर केअर हॉस्पीटल उभारण्याचा निर्णय घेतला. माझा जन्म जरी गुजरातमध्ये झाला असला तरी महाराष्ट्र हीच माझी कर्मभूमी आहे. ज्या भूमीने आपल्याला सर्वकाही दिले. तिला सुध्दा काही परत देण्याची जबाबदारी आपली सुध्दा आहे. याच भावनेने महाराष्ट्रात तीन ठिकाणी कॅन्सर रुग्णांसाठी कॅन्सर केअर हॉस्पीटल सुरु केले.या हॉस्पीटलच्या माध्यमातून जगातील दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देणार असल्याची ग्वाही टिना अंबानी यांनी दिली. कॅन्सर विरुध्द लढा उभारण्याचा सर्वजण संकल्प करुन चला सगळे कॅन्सरला कॅन्सल करण्याचा संकल्प करू या असे आवाहन टिना अंबानी यांनी केले.जिल्ह्यातील पर्यटन स्थळांचा विकास करणारगोंदिया जिल्ह्यात नवेगाबांध, नागझिरा व्याघ्र प्रकल्प व हॉजराफॉलसारखी पर्यटन स्थळे आहेत. या पर्यटनस्थळांचा विकास करुन त्यांचे सौंदर्य अधिक खुलविणार असल्याची ग्वाही टीना अंबानी यांनी या वेळी दिली.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारprafull patelप्रफुल्ल पटेल