नवेगावबांध : जागतिक पाणथळ दिनानिमित्त नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र गोंदिया अंतर्गत ३१ जानेवारीला क्षेत्र संचालक आर्यन रमानुजम व पूनम पाटी उपसंचालक नवेगाव नागझिरा व्याघ्र राजू चित्र गोंदिया यांच्या प्रमुख उपस्थितीत नवेगाव तलाव पाणथळ विकास कामाची पाहणी करून रांझीटोक येथे पाणथळ दिनाविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
राखी व्याघ्र प्रकल्प अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांचे हेलिपॅड मैदान नवेगावबांध येथे १ व २ फेब्रुवारीला क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांकरिता क्रिकेट, मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. नवेगावबांध परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. जागतिक पाणथळ दिनानिमित्त नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्यावतीने १ फेब्रुवारीला १० किमी रन फॉर वेटलँड मॅरेथॉन स्पर्धा पुरुष व महिला गटातून घेण्यात आले. कर्मचाऱ्यांचे, महिला तसेच पुरुष गटांचे हेलिपॅड मैदान नवेगावबांध येथे क्रिकेट सामने घेण्यात आले. जागतिक पाणथळ दिनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेत साकोली येथे रांगोळी स्पर्धेची थीम पानथळ ठेवण्यात आली होती. या स्पर्धेत अंजली चव्हाण यांनी प्रथम क्रमांक, वैशाली खोंडे द्वितीय, नूतन उईके व प्रमोद मेश्राम यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. नवेगावबांध येथे क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी करिता मॅराथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात महिला गटातून राणी पराते यांनी प्रथम, गीता लोखंडे दितीय व अर्चना मुलक्कलवार यांनी तृतीय क्रमांक पटकाविला तर पुरुष गटातून सचिन राणे प्रथम, नितीन मामीडवार दितीय, तर बलदेव खुलशाम यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. क्रिकेट स्पर्धेचे हेलिपॅड मैदान नवेगावबांध येथे आयोजित करण्यात आले होते. या स्पर्धेत महिला गटातून प्रथम क्रमांक विशेष व्याघ्र संरक्षण दल कोका संघाने विजेतेपद पटकावलं, तर ऑल रेंजेस नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव यांनी उपविजेतेपद पटकाविले. तर पुरुष गटात विशेष व्याघ्र संरक्षण दल नवेगावबांध या संघाला विजेतेपद मिळाले तर दुसऱ्या स्थानावर विशेष व्याघ्र संरक्षण दल वडेगाव यांना समाधान मानावे लागले. आर. एम. रामानुजम क्षेत्र संचालक व पूनम पाटील उपसंचालक नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र गोंदिया यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धक व संघांना ट्रॉफी व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी दादा राऊत प्रकाष्ठ निष्कासन अधिकारी नवेगावबांध हे अतिथी म्हणून उपस्थित होते.