शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
2
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
3
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
4
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
5
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्तूत्तर...
6
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
7
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
8
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
9
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
10
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
11
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

सत्ता परिवर्तनासाठी एकजुटीने काम करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 12:28 AM

गोंदिया जिल्ह्याचा वाली कोणीच नाही. जिल्ह्याला राज्यात मंत्रीपद लाभले मात्र विकास नाही. शेतकरी संकटात आहे. सुशिक्षीत बेरोजगारांना रोजगार नाही, झाशीनगर उपसा योजना रखडली आहे. शासनाच्या विविध योजनांचा निधी बंद झाला.

ठळक मुद्देप्रफुल पटेल : अर्जुनी-मोरगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : गोंदिया जिल्ह्याचा वाली कोणीच नाही. जिल्ह्याला राज्यात मंत्रीपद लाभले मात्र विकास नाही. शेतकरी संकटात आहे. सुशिक्षीत बेरोजगारांना रोजगार नाही, झाशीनगर उपसा योजना रखडली आहे. शासनाच्या विविध योजनांचा निधी बंद झाला. सत्ताधारी पक्ष साध्या चावडी बांधकामाचाही गाजावाजा करतो. एक नाय अनेक समस्या जिल्ह्यात आहेत. लोकांना समस्या सोडविण्यासाठी संघर्ष व रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवा या देशाचे चित्र राष्ट्रवादी काँग्रेसच बदलवू शकते. केंद्र व राज्यात सत्ता परिवर्तन घडून आणण्यासाठी एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन खा. प्रफुल पटेल यांनी कार्यकर्त्याना केले.बुधवारी स्थानिक प्रसन्न सभागृहात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी माजी आ. राजेंद्र जैन, जि.प.गटनेते गंगाधर परशुरामकर, मनोहर चंद्रिकापुरे, प्राचार्य यशवंत परशुरामकर, जि.प.सदस्य किशोर तरोणे, केतन तुरकर, जि.प.सदस्य भास्कर आत्राम, पं.स.सदस्य सुधीर साधवानी, जनार्धन काळसर्पे, रतीराम राणे, नारायण भेंडारकर, नामदेव डोंगरवार, चित्रलेखा मिश्रा, भोजराम रहिले, राकेश लंजे, लोकपाल गहाणे, शिशुला हलमारे, योगेश नाकाडे, यशवत गणवीर उपस्थित होते.पटेल म्हणाले, गोंदिया जिल्हा परिषदेत अभद्र युती झाली. अशा युतीमुळे आमच्या पक्षाला फायदाच होतो. ८ वरुन २० वर संख्याबळ आले येणाºया काळात २८ येतील, म्हणून आम्हाला युतीची गरजच नाही. शेतकरी संकटात आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी रोवणीच झाली नाही, जिथे रोवणी झाली तिथे पिकाला कीडीने ग्रासले गेल्या चार वर्षात धानाचे भाव दोन हजारावर गेले नाही, या सरकारची कर्जमाफीची मनस्थितीच नाही.कर्जमाफीसाठी आॅनलाईनसारखी किचकट प्रक्रिया अवलंबून शेतकºयांना वारंवार हेलपाट्या घालायला लावण्याचे काम केले. अद्यापही अनेक शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. अनेक रस्त्यांचे भूमिपूजन झाले, मात्र संबंधित विभागाजवळ रस्त्याची यादी नाही. ५४०० कोटी रुपयांची रस्ते गेली कुठे? असा प्रश्नही त्यांनी केला. या मतदारसंघाचे आमदार हे मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री असताना सुध्दा बीआरजीएफ, आयआरडीपी, यशवंत ग्राम योजनेसारख्या विविध योजनांचा निधीच बंद झाला.आता गावांचा विकास होईलच कसा असा सवाल केला. जनधनचे गोरगरीबांना खाते उघडायला लावले मात्र या खात्यात ठणठणाट आहे. चावडीचे बांधकाम केले तर हे गाजावाजा करतात आम्ही सीएसआर मधून अनेक विकासकामे केली त्याची चर्चा साधी चर्चाही करत नाही. राजकारण करायला शेतकरी व ओबीसी दिसतो मात्र त्यांच्या समस्या दिसत नाही. विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती मिळत नाही.अशा अनेक समस्यांचा पाढा खा. पटेल यांनी जनतेसमोर वाचला. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. कार्यक्रमाचे संचालन जे. के.काळसर्पे, प्रास्ताविक लोकपाल गहाणे यांनी केले. उपस्थितांचे आभार अनिल लाडे यांनी मानले.

टॅग्स :Praful Patelप्रफुल्ल पटेल