शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
7
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
8
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
9
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
10
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
11
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
12
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
13
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
14
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
15
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
16
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
17
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
18
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

दुसऱ्याचे जीवन फुलविणारे महादानाचे कार्य घडावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 21:59 IST

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दानात दान महादान म्हणजे रक्तदानाचे कार्य होय. आपल्या रक्तदानाने मृत्यूशय्येवर असलेल्या व्यक्तीचे जीवन फुलते. या दानापेक्षा दुसरे मोठे दान नाही. लोकमततर्फे विविध सामाजिक कार्यक्रमांची अंमलबजावणी केली जाते. त्यातच रक्तदान शिबिराचे आयोजन करणे हा एक स्तुत्य उपक्रम असून प्रत्येकाच्या हातून या महादानचे कार्य घडावे, असे उद्गार पोलीस ...

ठळक मुद्देदिलीप पाटील भुजबळ : स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दानात दान महादान म्हणजे रक्तदानाचे कार्य होय. आपल्या रक्तदानाने मृत्यूशय्येवर असलेल्या व्यक्तीचे जीवन फुलते. या दानापेक्षा दुसरे मोठे दान नाही. लोकमततर्फे विविध सामाजिक कार्यक्रमांची अंमलबजावणी केली जाते. त्यातच रक्तदान शिबिराचे आयोजन करणे हा एक स्तुत्य उपक्रम असून प्रत्येकाच्या हातून या महादानचे कार्य घडावे, असे उद्गार पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी काढले.लोकमत वृत्तपत्रसमूह व लोकमान्य रक्तसंकलन पेढीच्या संयुक्त विद्यमाने शहरातील सुभाष बागेतील हुतात्मा स्मारक येथे आयोजित रक्तदान शिबिराच्या उदघाटनाप्रसंगी ते बोलत होते. लोकमतचे संस्थापक व स्वातंत्र्य संग्राम सेनानी स्व. जवाहरलालजी दर्डा उपाख्य (बाबूजी) यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, लोकमान्य रक्तसंकलन पेढीच्या डॉ. पौर्णिमा नागपुरे, लोकमत कार्यालय प्रमुख मिलिंद वाढई, जिल्हा प्रतिनिधी अंकुश गुंडावार उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात स्व. जवाहरलालजी दर्डा उपाख्य (बाबूजी) यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दीप प्रज्वलनाने झाली. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. दिलीप पाटील भुजबळ म्हणाले, लोकमत सामाजिक बांधिलकीतून अनेक उपक्रम राबवित असते. सखी मंच, बाल मंच व युवा नेक्स्टच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविते. यामाध्यमातून समाजमन घडविण्याचे कार्य लोकमत करीत आहे. लोकमतचा ठसा वाचक वर्गावर असून विविध उपक्रमांतून समाजमन घडविण्याची लोकमतची तळमळ आज समाजात दिसून येते. या प्रसंशनिय कार्याबद्दल लोकमतची स्तुती केली.या वेळी रक्तगट तपासणी, हिमोग्लोबीन तपासणी, रक्तदाब तपासणी करून रक्तदानास सक्षम असलेल्या अनेकांनी स्वयंस्फुर्तीने रक्तदान केले. संचालन व आभार नरेश रहिले यांनी केले. या वेळी लोकमत समाचारचे जिल्हा प्रतिनिधी मुकेश शर्मा, जिल्हा संयोजक श्रीकांत पिल्लेवार, संयोजिका ज्योत्सना सहारे, अतुल कडू, मनिष मेश्राम, असलम खान, मीना डुंबरे, आम्रपाली वनकर, दीपा काशिवार, पिंकी गणवीर, ममता गडपायले, सुनंदा बावणकर, वनिता गुप्ता, पूजा टेंभरे, योगिनी पत्थे, शालू कृपाले, हिमेश्वरी कावळे, अल्का हर्ष, संतोष बिलोने व इतरांनी सहकार्य केले. यावेळी मदन बारबते, मनिष मेश्राम, दीपा काशिवार, अंकुश गुंडावार, सुनंदा बावणकर, अतुल कडू व इतरांनी रक्तदान केले.सुभाष बागेत वृक्षारोपणलोकमत वृत्तपत्र समूहतर्फे सुभाष बागेत आयोजित रक्तदान शिबिराच्या उदघाटनाला आलेले पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांच्या हस्ते स्व. जवाहरलालजी दर्डा उपाख्य (बाबूजी) यांच्या जयंतीनिमीत्त वृक्षारोपण बागेच्या परिसरात करण्यात आले. यावेळी सुभाष बागेत काम करणारा कर्मचारी वर्गही उपस्थित होता.