शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

जंगलाचे मालक म्हणून काम करा

By admin | Updated: January 23, 2017 00:16 IST

हा भाग जंगलव्याप्त असल्यामुळे शेतकरी वन्यप्राण्यांपासून शेतीचे संरक्षण करीत आहे.

प्रवीण परदेशी : धमदीटोला येथे वनहक्क समितीची सभा गोंदिया : हा भाग जंगलव्याप्त असल्यामुळे शेतकरी वन्यप्राण्यांपासून शेतीचे संरक्षण करीत आहे. ज्याप्रमाणे तुम्ही शेतीचे मालक म्हणून काम करीत आहात, त्याचप्रमाणे जंगलाचे मालक म्हणून काम केल्यास त्यापासून भरपूर लाभ मिळेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांचे अतिरीक्त मुख्य सचिव प्रविण परदेशी यांनी केले. देवरी तालुक्यातील धमदीटोला येथे शनिवारी (दि.२१) सामुहिक वनहक्क व्यवस्थापन समित्यांच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतांना आयोजित सभेत अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भूजबळ, मुख्य वनसंरक्षक टिएसके रेड्डी, उपवनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोजेक्ट दिल्ली कार्यालयाच्या टिना माथूर, सुशिल चौधरी, खोज संस्थेच्या संचालक पोर्णिमा उपाध्याय, विदर्भ निसर्ग मंडळ संस्थेचे दिलीप गोडे प्रमुख्याने उपस्थित होते. पुढे बोलताना परदेशी यांनी, ग्रामसभांनी समित्यांच्या माध्यमातून गावाच्या विकासाचा आराखडा तयार केला आहे. ज्या गावांची निवड करण्यात आली आहे त्या तालुक्याच्या तहसीलदार, गटविकास अधिकारी व कृषी अधिकाऱ्यांनी दर महिन्याला या गावाच्या प्रतिनिधींना बोलावून त्यांच्या समस्या जाणून घेवून तिथल्या विकास कामांना गती द्यावी. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून जास्तीत जास्त या भागातील कामे करावीत. या भागातील गावातील इतर समस्याही सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी काळे यांनी, वन हक्क कायद्यातून गावांना जास्तीत जास्त उत्पन्न मिळाले पाहिजे. बांधावर बांबू लागवड, सेंद्रीय शेती, तलावातून मासे उत्पादनात वाढ करणे आणि ग्रामीण पर्यटनाला चालना देणार असल्याचे सांगीतले. डॉ. भूजबळ यांनी, या भागातील विकास प्रक्र ीयेत पोलीस विभाग आपले योगदान देणार असल्याचे मत व्यक्त केले. श्री रेड्डी यांनी, इथल्या ग्रामसभेने तेंदूपत्ता न तोडता इतर वनोपजातून उत्पन्नाचे स्त्रोत वाढविले आहे. मोह संकलनासाठी येथे गोदाम बांधून देण्यात येईल. आॅटोमोबाईल, हॉटेल व्यवस्थापनाचे प्रशिक्षण या भागातील युवकांना देण्यात येईल त्यामुळे त्यांना रोजगार उपलब्ध होण्यास मदत होईल. संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून ग्रामस्थांचे उत्पन्न वाढण्यास मदत होत असल्याचे सांगितले. डॉ. रामगावकर यांनी, वन व्यवस्थापनाचा आराखडा तयार करण्यात आला असून विविध विभागांना सोबत घेवून कामे करण्यात येईल असे सांगितले. प्रास्तावीक गट ग्रामसभेचे सचिव संतरा मडावी यांनी मांडले. संचालन करून आभार तुलाराम उईके यांनी मानले. कार्यक्रमासाठी गोपाल कुमेटी, नारायण सलामे, तुलाराम उईके, सुदाम भोयर, जीवन सलामे, दुर्वेश कुमरे व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले. (शहर प्रतिनिधी) पाहुण्यांना सेंद्रीय तांदूळ व सुरन भेट वनहक्क व्यवस्थापन समितीच्या सभेसाठी आलेल्या पाहुण्यांना मिरा वालदे, व बिंदा मडावी यांनी सेंद्रीय तांदूळ व सुरनकंद भेट देत त्यांचे स्वागत केले. विशेष म्हणजे सभेला धमदीटोला, वासनी, मांगाटोला, मेहताखेडा, कोसबी, सुंदरी, पौलझोला, महाका, धवालखेडा, सडक/अर्जुनी तालुक्यातील चिचिडी, दल्ली , खडकी, राजगुडा, मोगरा व उसिखेडा येथील सामुहिक वनहक्क व्यवस्थापन समित्यांचे पदाधिकारी उपस्थित होते.