शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

रोजगार हमी योजनेची कामे सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 10:53 PM

तिरोडा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्राम अर्जुनी येथील मजुरांना लवकर काम उपलब्ध व्हावे या उद्देशाने महाराष्ट्र राज्य ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कामांची सुरुवात खंड विकास अधिकारी जावेद इनामदार यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

ठळक मुद्दे५०० मजुरांची उपस्थिती : बाहेरगावी होणारे पलायन थांबले

आॅनलाईन लोकमतइंदोरा (बुज.) : तिरोडा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्राम अर्जुनी येथील मजुरांना लवकर काम उपलब्ध व्हावे या उद्देशाने महाराष्ट्र राज्य ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कामांची सुरुवात खंड विकास अधिकारी जावेद इनामदार यांच्या उपस्थितीत करण्यात आली.भूमिपूजन जि.प. सदस्य कैलास पटले यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी सरपंच समीक बन्सोड, उपसरपंच चंद्रकुमार भगत, सदस्य राजू चव्हाण, ओमन बनकर, प्रिया बावनकर, शारदा पटले, इंदू चौधरी, रहांगडाले, दुर्गा साकुरे, रुपलाल अंबुले, चतुर्भज बिसेन, विस्तार अधिकारी भायदे, राजेश मेश्राम, युवराज पटले, जयहरी साकुरे व ग्रामस्थ उपस्थित होते.सदर कामांतर्गत खडबंदा जलाशयाच्या अर्जुनी-बोंडराणी कालव्याचे खोलीकरण व दुरुस्ती कामाची सुरुवात करण्यात आली. कामासाठी १३ लाख ३०० रुपये मंजूर करण्यात आले आहे. या कामासाठी ८३१ मजुरांची मस्टर यादी मंजूर करण्यात आली. पहिल्या दिवशी कामाची सुरुवात झाली तेव्हा ४९१ मजूर कामावर उपस्थित होते.या कामामुळे गावातील मजुरांना रोजगार मिळाला. दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये गावातील मजुरांचे बाहेरगावी कामासाठी जाणे थांबले. गावातील शेतकरी, शेतमजूर यांना गावामध्येच काम उपलब्ध झाले. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.खंड विकास अधिकारी जावेद इनामदार यांनी कामावरील मजुरांना गाव स्वच्छ व हागणदारी मुक्त ठेवावे. प्रत्येक नागरिकाने शौचालयाचा वापर करावा. महिला-पुरुषांनी उघड्यावर शौचास जाऊ नये. नियमांचे पालन न केल्यास दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल, असे सांगितले.जि.प. सदस्य कैलास पटले यांनी, प्रत्येक नागरिकास १०० दिवस काम मिळावे यासाठी कामाची तरतूद करण्यात आली आहे. लोकांचे बाहेर पलायन होऊ नये म्हणून रोहयोच्या कामांना सुरुवात करण्यात आली आहे. प्रत्येक मजुराने अंग मेहनतीने काम करावे, जेणेकरुन पगारामध्ये कुठल्याही प्रकारचा परिणाम येणार नाही, याची दक्षता घ्यावी. सुंदर गाव व स्वच्छ परिसराची संकल्पना सर्वांनी साकार करावी, असे सांगितले. संचालन उपसरपंच चंद्रकुमार भगत यांनी केले. आभार सरपंच समीक बन्सोड यांनी मानले.