शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

युवतींनी सिकलसेलची तपासणी करुन घ्यावी

By admin | Updated: December 18, 2014 01:26 IST

आजही ग्रामीण भागातील बहुतांश लोकांमध्ये अशिक्षितपणा आहे. अशांना शिक्षीत करण्याची आज गरज आहे.

देवरी : आजही ग्रामीण भागातील बहुतांश लोकांमध्ये अशिक्षितपणा आहे. अशांना शिक्षीत करण्याची आज गरज आहे. या भागातील युवतींना जर निरोगी व सिकलसेलमुक्त पिढीची निर्मिती करायची व सिकलसेल मुक्त पिढीची निर्मिती करायची असेल तर त्यांनी विवाहपुर्वी कुंडली न तपासता आपल्या जोडीदाराशी रक्त तपासणी करुनच लग्न करावे, असे आवाहन जि.प.च्या महिला व बालकल्याण सभापती सविता पुराम यांनी केले.देवरी येथे शासकिय मुलीेंच्या वसतिगृहात सिकलसेल नियंत्रण सप्तहानिमित्त आयोजित रक्ततपासणी शिबिरात अध्यक्षस्थानावरुन त्या बोलत होत्या. हा शिबिराचा कार्यक्रम राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत जि.प. विभाग गोंदिया, प्रबुद्ध विनायती कल्याणकारी संस्था फूलचूर आणि तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय देवरीच्या संयुक्त विद्यमानाने देवरी येथील शासकीय मुलींचे वस्तिगृहात सिकलसेल सप्ताहात तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिराचे उद्घाटन क्रांतीवीर बिरसामुंडा व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन व दिप प्रज्वलन करुन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन देवरी पं.स. चे सभापची कामेश्वर निकोडे, यांच्याहस्ते आणि गोंदिया जि.प. च्या महिला व बालकल्याण सभापती सविता पुराम यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. देवरीसारख्या आदिवासी दुर्गम भागातील जास्तित जास्त युवतींनी आपले सिकलसेलचे रक्त तपासणी करुन घ्यावे, असे आवाहन यावेळी पाहुण्यांनी केले.या प्रसंगी माजी पं.स. सभापती उषा शहारे, डॉ. मीना वट्टी, जिल्हा सिकलसेल समन्वयक खंडाईत, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हुमने, मल्ला प्रा.आ. केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुजाता मरापे आणि शा. मुलीचे वस्तीगृहातील अधीक्षक कटनाहके व वाघमारे सह तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील अधिकारी व आरोग्य कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते. सभापती निकोडे, माजी सभापती शहारे, दुमणे, सिकलसेल पर्यवेक्षक तावाडे व कार्यक्रमाचे अध्यक्ष पुराम यांनी सिकलसेल नियंत्रणाबद्दल योग्य मार्गदर्शन केले. या रक्ततपासणीत २०० मुलीचे रक्त तपासणी करण्यात आले. त्यापैकी ४८ मुलीचे रक्त तपासणी करण्यात आले. त्यापैकी ६ मुलीचे मुलीचे नमुने पॉझिटीव्ह निघाले. कार्यक्रमाचे संचालन क्षयरोग तज्ज्ञ डॉ. संजय भागवतकर यांनी केले. आभार सोनटक्के यांनी मानले. (प्रतिनिधी)