शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

महिलांनी संकुचित वृत्ती नाकारावी

By admin | Updated: March 15, 2015 01:40 IST

आजघडिला महिला वर्ग पुरूषांच्या बरोबरीने पुढे येत आहे. विविध क्षेत्रांमध्ये महिलांनी भरारी घेतली. राजकीय क्षेत्रातही महिलांनी ५० टक्के आरक्षण प्राप्त झाले आहे.

बोंडगावदेवी : आजघडिला महिला वर्ग पुरूषांच्या बरोबरीने पुढे येत आहे. विविध क्षेत्रांमध्ये महिलांनी भरारी घेतली. राजकीय क्षेत्रातही महिलांनी ५० टक्के आरक्षण प्राप्त झाले आहे. राजकीय जीवनात पदार्पम करून महिलांनी आपले कौशल्य, संघटनशक्ती, कर्तव्यपरायणता सिद्ध करण्यासाठी सज्ज राहणे गरजेचे आहे. पुरूषांच्या तुलनेत महिलांचे गुणोत्तर प्रमाण कमी आहे, ही चिंतेची बाब आहे. महिलांचा विकास व्हावा यासाठी शासनाच्या विविध योजना आहेत. यासाठी महिलांनी मनात संकुचित वृत्ती न बाळगता सहकार्याची भूमिका आत्मसात करून महिलांच्या विकासासाठी कार्यरत राहावे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य अरविंद शिवणकर यांनी केले. एकात्मिक बाल विकास प्रक ल्प अंतर्गत ग्राम खांबी येथे १३ मार्च रोजी घेण्यात आलेल्या महिला मेळाव्यात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. उद्घाटन पंचायत समिती सभापती तानेश ताराम यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती उपसभापती पोमेश्वर रामटेके, जिल्हा परिषद सदस्य मधूकर मरसकोल्हे, गट विकास अधिकारी जी.डी. कोरडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष बंडू भेंडारकर, सरपंच शारदा खोटेले, भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष रघुनाथ लांजेवार, उपसरपंच प्रमोद खोेटेले, नेमीचंद मेश्राम, सुदेश खोटेले उपस्थित होते. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व शारदामातेच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली. पुढे बोलताना शिवणकर यांनी, महिलांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना आहेत. या योजनांचा लाभ घेण्यासाठी बीपीएलची अट मारक असल्याचे त्यांनी आवर्जुन सांगीतले. तर आजची महिला अबला नसून सबला आहे. आरक्षणाचा लाभ घेऊन महिलांनी आपली कर्तव्यपरायणता दाखवावी. घराला सुसंस्कारित ठेवणारी महिलाच कुटुंबाला निश्चितपणे पुढे नेते असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. दरम्यान पाहुण्यांनीही आपले विचार मांडले. याप्रसंगी किशोरवयीन मुली तसेच आंगणवाडीतील मुलांनी सांस्कृतीक कार्यक्रम सादर केले. तर महिलांची पाककला, हस्तकला व रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. तसेच पाककलेतील विजेत्या योगीता खोटेले, संतोषी साखरे, हस्तकला स्पर्धेत अमीशा उरकुडे, प्रीती उरकुडे तर रांगोळी स्पर्धेत प्रतिज्ञा दहिवले, प्रगती शिवणकर या विजेत्या ठरल्या असून त्यांना पाहुण्यांच्या हस्ते पुरस्कृत करण्यात आले. बाल विकास प्रकल्प अधिकारी निशा आगाशे यांनी संचालन करून प्रास्ताविक मांडले. आभार उर्मिला खोब्रागडे यांनी मानले. मेळाव्याला धाबेपवनी, नवेगावबांध, चाना-बाक्टीमधील अंगणवाडी कार्यकर्ता, मदतनीस यांच्यासह परिसरातील महिला मोठ्या संख्येत उपस्थित होत्या. (वार्ताहर)