शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ कोणत्या पक्षात? जयंत पाटील म्हणाले,"उद्या निकालानंतर सांगतो...";
2
...तर मी स्वत:ला संपवून घेईन: सोनवणेंचा निवडणूक अधिकाऱ्याला इशारा; पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
3
लोकसभेच्या निकालाआधीच पवारांकडून विधानसभेची तयारी सुरू?; भाजपच्या माजी आमदाराने घेतली भेट
4
देशात इंडिया आघाडीचे सरकार येईल? काँग्रेसचे 'चाणक्य' डीके शिवकुमार यांनी केली ही भविष्यवाणी
5
'भाजपाला चिंतनाची गरज' म्हणणाऱ्या एकनाथ खडसेंना महाजनांनी सुनावलं, म्हणाले- "तुम्ही आधी सांगा..."
6
चोराचा अजब कारनामा; चोरी करायला घरात शिरला अन् AC च्या थंडाव्यात झोपी गेला, सकाळी...
7
"मोदींची ध्यानधारणा हीदेखील 'मूक पत्रकार परिषद'च होती"; संजय राऊतांचा आयोगावर पलटवार
8
कशी होते मतांची मोजणी? EVM-VVPAT स्लिप्सचे काय होते? जाणून घ्या संपूर्ण ABCD...
9
निकालाआधीच कोल्हापूरात विजयाची चर्चा, शाहू महाराजांचे झळकले पोस्टर
10
पुलवामामध्ये मोठी चकमक; टॉप कमांडर रियाझ अहमद डारसह आणखी एकाला कंठस्थान
11
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा Exit Poll आला; इंडिया आघाडीला किती जागा मिळणार, पाहा...
12
कार जाऊ द्या, आता बाईकमध्येही आली 'एअरबॅग'; होंडाच्या या दुचाकीचा किंमत किती माहित्येय?
13
भारतात आल्यावर पहिल्यांदा मृणाल दुसानीसने या पदार्थावर मारला ताव
14
मोदी तिसऱ्यांदा सत्तेत आले तर काहीतरी भव्य दिव्य होणार; 10 हजार पाहुणे, स्थळ अन् तारीखही ठरली...
15
आरोग्यासाठी फायदेशीर असणारं लिंबू पाणी नेमकं कधी प्यावं?; जाणून घ्या, योग्य वेळ
16
शेअर बाजार 'रेकॉर्ड हाय'वर बंद; 'Modi Stocks'नं एकाच दिवसात केलं मालामाल, अदानींचे शेअर्स रॉकेट
17
लोकसभा निकालाआधीच बॉलिवूडमध्ये मोदींचा डंका! 'या' खानने BJP चं केलं अभिनंदन, म्हणाला...
18
लोकसभेच्या निकालाआधीच उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; निवडणूक आयोगाचे कारवाईचे आदेश
19
"भाजपाने सत्तेसाठी इतरांची सरकारं पाडली, कुटुंबांमध्ये भांडणं लावली"; अखिलेश यादवांची टीका
20
धावत्या CNG कारला लागली आग; 4 जणांचा होरपळून मृत्यू, नेमकी कुठे चूक झाली..?

रस्ता तयार न करताच निधीची उचल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 10:31 PM

रस्ता तयार न करताच काम पूर्ण झाल्याचे दाखवून निधीची उचल केल्याचा प्रकार आमगाव तालुक्यात उघडकीस आला आहे. यात संबंधित विभागाचे अभियंत्याचा समावेश असल्याची माहिती पुढे आली आहे.

ठळक मुद्देजि.प.चा रस्ते बांधकाम घोटाळा : पंचायत समिती सभेत गाजला मुद्दा

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : रस्ता तयार न करताच काम पूर्ण झाल्याचे दाखवून निधीची उचल केल्याचा प्रकार आमगाव तालुक्यात उघडकीस आला आहे. यात संबंधित विभागाचे अभियंत्याचा समावेश असल्याची माहिती पुढे आली आहे. हा सर्व प्रकार पंचायत समितीच्या बुधवारी (दि.१६) पार पडलेल्या सभेदरम्यान पुढे आली आहे.शासनाच्या ३० जून २०१७ प्रमाणे तालुक्यात विविध कामांना मंजुरी देण्यात आली. शासनाने या प्रस्तावित कामांना निधी मंजुर केला. परंतु या प्रस्तावित कामांना कागदावर दाखवून येथील जिल्हा परिषद बांधकाम उपविभागातील काही अभियंत्याच्या मदतीने कंत्राटदारांनी कामे न करताच निधीची उचल केल्याची बाब पंचायत समितीच्या सदस्यांनी उघडकीस आणली.प्राप्त माहितीनुसार आमगाव तालुक्यातील जवरी ते बोथली या रस्त्यावर खडीकरण व रस्ता बांधकामाकरिता ३ लाख रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला. तर किडंगीपार स्मशानघाट रस्ता खडीकरण, माल्ही किडंगीपार, बनगाव इंद्रप्रस्थनगर मुरुम रस्ते निर्माण, तसेच नाली बांधकाम अशा अनेक कामांचे प्रत्यक्षात बांधकाम न करताच बांधकाम विभागातील एक अभियंता व काही कंत्राटदारांसोबत संगनमत करुन निधीची उचल केल्याची धक्कादायक बाब पंचायत समितीच्या सभेत उघडकीस आली. माजी प.स.उपसभापती ओमप्रकाश मटाले, विद्यमान सभापती बोरकर, उपसभापती जयप्रकाश शिवणकर यांनी जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग आमगाव अंतर्गत शासनाच्या निधीअंतर्गत करण्यात आलेल्या कामांच्या अहवालांचे अवलोकन केले. मंजुर निधी अंतर्गत बांधकाम झाले किंवा नाही याची पाहणी केली. त्यात बांधकामाच झाले नसल्याची बाब पुढे आली. यासंदर्भात वारंवार संबंधित विभागाला विचारणा केली असता अभियंत्यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन पदाधिकाऱ्यांची दिशाभूल केली. सभेत अभियंत्याने सदर कामे झाले नसल्याची कबुली दिली. यावर अभियंत्याविरुद्ध ठराव पारित करुन कार्यवाहीसाठी प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषद