नेहमी जिल्हावासीयांच्या सोबत राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2019 05:00 AM2019-11-11T05:00:00+5:302019-11-11T05:00:11+5:30

राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार येणार व ते शहर विकासासाठी पुरेपुर सहकार्य करणार. जिल्ह्यातील शेतकरी, युवा व महिलांच्या कोणत्याही समस्या असोत आपण नेहमी त्यांच्या सोबत उभे राहणार असे प्रतिपादन माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.

Will always be with the people of the district | नेहमी जिल्हावासीयांच्या सोबत राहणार

नेहमी जिल्हावासीयांच्या सोबत राहणार

Next
ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : दिवाळी मिलन कार्यक्रम उत्साहात

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कार्यकर्त्यांनी आपापल्या क्षेत्रात मेहनत केली व त्यामुळे निवडणुकीत ७६ हजार मते मिळाली. काही कारणांनी निवडणुकीत यश मिळाले नाही. तरीही शहरासाठी निर्धारीत केलेली कामे निश्चितच पूर्ण केली जाणार. राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार येणार व ते शहर विकासासाठी पुरेपुर सहकार्य करणार. जिल्ह्यातील शेतकरी, युवा व महिलांच्या कोणत्याही समस्या असोत आपण नेहमी त्यांच्या सोबत उभे राहणार असे प्रतिपादन माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.
येथील प्रताप लॉनमध्ये आयोजित दिवाळी मीलन कार्यक्रमात ते बोलत होते. पुढे बोलताना त्यांनी निवडणुकीत जय-पराजय लागून आहे. आज हारलो तर यापुर्वी कित्येकदा जिंकलो होतो. आता भविष्यात पुन्हा जिंकून क्षेत्राच्या विकासाला गती देणार असा आशावाद व्यक्त केला. याप्रसंगी नगराध्यक्ष अशोक इंगळे यांनी, गोपालदास अग्रवाल काम करणारे नेता आहेत. निवडणुकीचा जो काही निर्णय असो मात्र शहरातील प्रलंबीत भुयारी गटार योजना, नवीन उड्डाणपूल आदि कामांसह शहराला स्मार्ट सिटी बनविण्यासाठी मिळून प्रयत्न करणार असे सांगीतले.
याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, हुकुमचंद अग्रवाल, रामरतन राऊत, भरत बहेकार, भेरसिंह नागपुरे, अशोक चौधरी, माधुरी हरिणखेडे, चेतना पराते, दिपक कदम, दिनेश दादरीवाल, खोमेश्वर रहांगडाले, सुनील केलनका, भावना कदम, पंकज रहांगडाले, विजय जायस्वाल, अ‍ॅड.रतनलाल अग्रवाल, गोविंद अग्रवाल, डॉ.नामदेव किरसान, झामसिंह बधेले, राधेलाल पटले, राधेशाम बगडिया, अशोक अग्रवाल, विजय टेकाम, लता दोनोडे, रमेश अंबुले, किशन खंडेलवाल, डॉ.जी.पी.येडे, अमृत इंगळे, संतोष ठाकुर, मीनू बडगुजर, गोपीकिशन मुंदडा, शंभूशरण ठाकुर, गणेश हेमणे, करसन वडेरा, गणेशप्रसाद इसरका, जयनारायण जोशी, अरूण माहेश्वरी, देवेंद्र अजमेरा, छैलबिहारी अग्रवाल यांच्यासह मोठ्या संख्येत कॉँग्रेस, भाजप व अन्य पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच नागरिक उपस्थित होते.

Web Title: Will always be with the people of the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.