शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

पाच लाख रुपयांच्या हुंड्यासाठी बायकोचा छळ; सासूरवाडीतील चौघांवर केला गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 16:21 IST

पाथरी येथील प्रकरण : पागल म्हणून हिनावत सासरची मंडळी करीत होती विवाहितेचा सतत छळ

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : माहेरून पाच लाख रुपये आण अन्यथा तुला माझ्या घरात राहू देणार नाही, असे म्हणत सासूरवाडीत विवाहितेचा छळ केला जात असल्याचे प्रकरण उघडकीस आले. सन २०१७पासून हा प्रकार सुरू असून, या घटनेसंदर्भात गोरेगाव पोलिसात सोमवारी (दि. २४) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोरेगाव तालुक्यातील ग्राम पाथरी येथे माहेर असलेली यास्मिन सादिक शेख (२७, रा. कोपे-चुलोद, ता. लालबर्रा, जि. बालाघाट -मध्य प्रदेश) हिचे लग्न ३० एप्रिल २०१७ रोजी सादिक शेख (३२) सोबत झाले होते. पती सादिक शेख हा तिला माहेरून हुंड्याच्या स्वरुपात पाच लाख रुपये आण, अशी मागणी करीत मारहाण व शिवीगाळ करीत असे. सासू जोहरा जमशेर शेख, भासरा आशिक जमशेर शेख (३५) व जाऊ शबनम आशिक शेख (२८) हे यास्मिनला पागल आहे, असे म्हणून नेहमी त्रास देत होते. या विषयाला घेऊन २६ फेब्रुवारी २०२५ रोजी पाथरी येथे तंटामुक्त गाव समितीची सभा घेण्यात आली असता सादिकने पंचांसमक्ष यास्मिनच्या वडिलांना मी तुमच्या मुलीला दवाखान्यात पैसे लावले, त्याचे पाच लाख रुपये द्या, तरच मी तुमच्या मुलीला घेऊन जाईन, असे सांगितले. त्यांचे प्रकरण भरोसा सेल येथे गेले होते. परंतु, भरोसा सेलमध्ये तडजोड न झाल्याने सादिक शेख, जोहरा जमशेर शेख (६०), आशिक शेख व शबनम शेख (सर्व रा. कोपे - चुलोद, ता. लालबर्रा, जि. बालाघाट मध्य प्रदेश) यांच्यावर गोरेगाव पोलिसात भान्यासं २०२३ कलम ८५, ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

...अन् तिचा नंबर ब्लॉकमध्ये टाकला७ नोव्हेंबर २०२४ रोजी यास्मिन शेख ही पतीसोबत गोंदिया येथे आली होती. उपचार करून तिला सादिकने ऑटोमध्ये बसवून पाथरी येथे पाठविले. मला काम आहे ते आटोपून पाथरी येथे परत येतो, असे सांगून तो निघून गेला व तिचा नंबर ब्लॉकमध्ये टाकला दुसऱ्या मोबाइलवरून यास्मिन यांनी फोन केले असता त्याने तुझ्या आई-वडिलांनी तुला दवाखान्यात पैसे लावले नाहीत व हुंड्याचेही पैसे दिले नाहीत. त्यामुळे मी तुला घेऊन जात नाही, मी इस्तेमाह कमिटी, भंडारा येथे अर्ज केला आहे, तिथून तुला पत्र येणार आहे, असे सांगून त्याने फोन कट केला होता.

टॅग्स :dowryहुंडाdowry probition actहुंडा प्रतिबंधक कायदाgondiya-acगोंदिया