शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
2
'चांगली डील मिळेल तिथूनच तेल खरेदी करू'; अमेरिकेच्या टॅरिफवर भारताची रोखठोक भूमिका
3
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
4
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
5
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
6
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
7
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
8
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
9
शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत
10
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
11
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
12
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
13
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
14
Lalbaugcha Raja 2025 First Look: 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
15
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
16
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
17
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
18
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
19
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
20
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक

पाच स्रोतांतून विधवा ‘मालता’च्या कुटुंबाला मिळाली आर्थिक बळकटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 22:37 IST

पतीच्या निधनानंतर आपल्या तिन्ही मुलांचे शिक्षण व भविष्य कसे होईल, याच चिंतेत नेहमी असणाऱ्या सालेकसा तालुक्याच्या लोहारा येथील मालता माणिकलाल कटरे यांनी बचत गटाच्या माध्यमातून कमाईचे पाच स्रोत निर्माण केले व आपल्या संकटांवर हमखासपणे मात दिली.

ठळक मुद्देलहरी स्वयंसहायता महिला बचत गट : पतीच्या निधनानंतर सांभाळला परिवार

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : पतीच्या निधनानंतर आपल्या तिन्ही मुलांचे शिक्षण व भविष्य कसे होईल, याच चिंतेत नेहमी असणाºया सालेकसा तालुक्याच्या लोहारा येथील मालता माणिकलाल कटरे यांनी बचत गटाच्या माध्यमातून कमाईचे पाच स्रोत निर्माण केले व आपल्या संकटांवर हमखासपणे मात दिली. मुलांना शिक्षण देऊन त्यांच्यासाठी व्यवसाय उभारून आज त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या आहेत.पतीच्या निधनांनतर कुटुंबाच्या भवितव्याच्या चिंतेत असतानाच मालता यांच्याकडे सीआरपी आल्या व गटाबद्दल सगळी माहिती सांगितली. तेव्हा त्यांना गटाचे महत्व समजले. त्यांनी मोहल्ल्यातील महिलांना विचारून सीआरपीकडून गटाचे महत्व त्यांना पटवून दिले. नंतर १४ महिलांनी मिळू एक गट तयार केला. गटाचे नाव लहरी स्वयंसहायता महिला बचत गट असे ठेवण्यात आले. गटातील महिलांनी अध्यक्ष म्हणून त्यांची निवड केली.आधी या गटाची मासिक बचत ५० रूपये होती. ती वाढवून १०० रूपये करण्यात आली. दरम्यान मालता यांना मुलांचे शिक्षण व भविष्याचे विचार भेळसावत होते. अशात सर्वात मोठा आधार त्यांना बचत गटामुळे मिळाला. त्या एक हजार रूपये महिन्याने शाळेत खिचडी बनविण्याचे काम व शेतीसुद्धा करीत होत्या.दरम्यान गटाला १५ हजारांचा फिरता निधी (आरएफ) मिळाला. त्यामधून त्यांनी १० हजार रूपयांचे कर्ज घेवून मनिहारी व्यवसाय सुरू केला.शाळेत खिचडी बनवित असल्यामुळे शनिवार व रविवार गावामध्ये फिरून त्या मनिहारी व्यवसाय करू लागल्या. गावात सर्वांना माहीत असल्यामुळे त्यांच्या घरूनही वस्तू विक्री होत होत्या. पण एवढ्यात घर खर्च व मुलांच्या शिक्षणाचा खर्च पूर्ण होत नव्हता.त्यामुळे त्यांनी ग्रामसंस्थेतून सीआयएफचे ५० हजार रूपये कर्ज घेतले व मोठ्या मुलाच्या व्यवसायाला हातभार लावला.यानंतर आयसीआयसीआय बँकेकडून गटाला एक लाख रूपयांचे कर्ज मिळाले. मनिहारी व्यवसायासाठी भांडवल कमी पडत असल्यामुळे त्या रकमेची त्यात गुंतवणूक करून व्यवसाय सुरू केले. त्यानंतर गटाला पुन्हा एक लाख ९८ हजार रूपयांचे कर्ज मिळाले. त्यातून त्यांनी एक लाख रूपयांचे कर्ज घेतले.दरम्यान उन्हाळा सुरू झाल्याने आपल्या दोन मुलांच्या व्यवसायासाठी घोडी विकत घेतली. ही घोडी आॅर्डरप्रमाणे लग्नात नेण्यात येत होती. त्यातून त्यांना ५० हजार रूपयांचा नफा मिळाला. ८ मार्च २०१७ रोजी सहारा लोकसंचालित साधन केंद्राद्वारे महिला जागतिक दिनाला त्यांची घोडी बोलाविण्यात आली होती. आता मालता यांच्याकडे खिचडी, मनिहारी, मोठ्या मुलाची कमाई, घोडी व शेती असे कमाईचे पाच स्त्रोत आहेत. गटात आल्यामुळेच मुलांचे शिक्षण व त्यांच्यासाठी व्यवसाय त्या उभारू शकल्या. त्यामुळे त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकल्या.मुलांनाही केले आत्मनिर्भरसालेकसा तालुक्यातील लोहारा गावात एकूण २० बचत गट आहेत. यापैकी लहरी बचत गटात एकूण २० महिला असून ६ मे २०१४ रोजी स्थापना झाली. याच गटाचे अध्यक्ष मालता आहेत. त्यांना तीन मुले असून मोठा मुलगा नागपूर येथे सेंट्रिंग मिस्त्री काम करतो. भाड्याच्या खोलीमध्ये राहत असल्यामुळे त्याला ते परवडत नव्हते. त्यामुळे मालता यांनी ग्रामसंस्थेतून सीआयएफचे ५० हजार रूपये कर्ज घेतले व स्वत:जवळचे ५० हजार रूपये गोळा करून मुलाला नागपूरबाहेर प्लॉट खरेदी करून दिला. तसेच त्या कर्जाची परतफेड करून दुसºया कर्जातून इतर दोन मुलांसाठी घोडी खरेदी करून दिली. लग्न समारंभात व इतर कार्यक्रमात आॅर्डरनुसार घोडी नेऊन अर्थार्जन करीत आहे. मालता पतीच्या निधनाने खचून न जाता आत्मविश्वास व गटाच्या माध्यतून मुलांनाही आत्मनिर्भर करून एक आदर्श निर्माण केला आहे.