शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

दररोज धावतात शंभराहून अधिक गाड्या तरी विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालय गोंदियात का नाही?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 20:05 IST

Gondia : येथे विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) कार्यालय आणि महाव्यवस्थापक कार्यालय नागपूर येथे सुरू करण्याची मागणी अनेक दिवसांपासून केली जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : येथे विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) कार्यालय आणि महाव्यवस्थापक कार्यालय नागपूर येथे सुरू करण्याची मागणी अनेक दिवसांपासून केली जात आहे. पण रेल्वे मंत्रालयाने याची अद्यापही दखल घेतली नाही. त्यामुळे हा प्रश्न कायम आहे. विभागीय रेल्वे कार्यालय गोंदिया येथे सुरु करण्याची नेमकी अडचण काय असा सवाल जिल्हावासीयांकडून केला जात आहे.

रेल्वे मंत्रालयाने दोन दिवसांपूर्वी जबलपूर-चंद्रपूर आणि गोंदिया-चंद्रपूर रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणाला मंजुरी दिली. ही दिलासादायक बाब आहे. गोंदिया हे व्यस्त रेल्वे स्थानक असून दररोज जवळपास १०० एक्सप्रेस, लोकल, डेमू व मालगाड्या येथून धावतात. हे बिलासपूर झोनमधील सर्वाधिक महसूल देणारे स्थानक असून महाराष्ट्राच्या पूर्व टोकावर आहे. नवेगाव-नागझीरा व्याघ्र प्रकल्प, कचारगड, प्रतापगड, मांडोदेवी जवळ असल्याने येथे विदर्भ एक्स्प्रेस, महाराष्ट्र एक्स्प्रेस, वैनगंगा एक्स्प्रेस, चेन्नई एक्स्प्रेस सारख्या गाड्या धावतात गोंदिया मध्यवर्ती ठिकाण असल्याने विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालय सुरू करावे व नागपूरसाठी महाप्रबंधक (झोनल) कार्यालय उभारावे, अशी मागणी माजी जि.प. सभापती अशोक लंजे यांनी अनेकदा रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा करुन केली. यामुळे व्यवस्थापन, देखरेख आणि सुविधा वेळेवर मिळतील. शिवाय स्थानिक विकासाला सुध्दा चालना मिळण्यास मदत होईल.

सौंदड येथे थांब्याची मागणी

गोंदिया-बल्लारशा मार्गावरील सौंदड रेल्वे स्थानकावर गाडी क्र. १२८५१-५२ (बिलासपूर-चेन्नई) आणि १२२५१-५२ (वैनगंगा एक्स्प्रेस) यांचा थांबा १५ वर्षे सौंदड येथे होता. पण कोविडनंतर बंद झाला असून अद्याप सुरू नाही. जबलपूर-चंद्रपूर गाडी क्र. २२१७३-७४ चा थांबा सौंदड, अर्जुनी मो., सिंदेवाही येथे द्यावा, अशी मागणी केली आहे. नागपूर डीआरएम यांनी बिलासपूरकडे प्रस्ताव पाठविला आहे.

"गोंदिया येथे रेल्वेचे विभागीय कार्यालय सुरु झाल्यास रेल्वे जाळे अधिक विस्तारण्यास आणि स्थानिक विकासाला चालना देण्यास मदत होईल. यासंदर्भात रेल्वे मंत्रालयाकडे अनेकदा पाठपुरावा करण्यात आला. पण त्याची दखल घेण्यात आली नाही. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी सुद्धा यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे."- अशोक लंजे, माजी जि.प. सभापती

English
हिंदी सारांश
Web Title : Despite Heavy Rail Traffic, Why No DRM Office in Gondia?

Web Summary : Gondia, a busy railway hub generating high revenue, lacks a Divisional Railway Manager (DRM) office. Locals question the delay, advocating for improved management, timely facilities, and regional development through the establishment of a DRM office and Zonal office.
टॅग्स :railwayरेल्वेrailway recruitmentरेल्वेभरती