शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

मुलींमध्ये वंध्यत्वाची समस्या का वाढली? सहा पैकी एका जोडप्याला वंध्यत्वाची समस्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2024 16:45 IST

स्त्री-पुरुषांमध्येही वंध्यत्वाची समस्या : वंध्यत्वाची आहेत विविध कारणे

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : घरात बाळाच्या हसण्या खिदळण्याचे सुख काही वेगळेच असते व ते सुख प्रत्येकाला हवे असते. वंध्यत्व समस्या स्त्री आणि पुरुष दोघांनाही असू शकतात. महिलेचे वय ३५ पेक्षा कमी आहे आणि एक वर्षाहून अधिक काळ नैसर्गिकरीत्या प्रयत्न करूनही गर्भधारण करू शकत नाही, तेव्हा ते जोडपे 'इनफर्टिलिटी' म्हणजेच वंध्यत्वाच्या समस्येने ग्रस्त असल्याचे म्हटले जाते. स्थूलता, कठोर शारीरिक श्रम, अतिव्यायाम, मादक पदार्थांचा वापर, जास्त मद्यपान, उच्च रक्तदाब आणि इतर यांसारख्या जीवनशैली घटकांमुळे वंध्यत्व येते.

का वाढले वंध्यत्व? महिलेचे वय ३५ पेक्षा जास्त असेल आणि ६ महिन्यांहून अधिक काळ प्रयत्न करूनही मूल होऊ शकत नसेल, तर ही वंध्यत्व स्थिती असते. भारतात दर सहा पैकी एका जोडप्याला वंध्यत्वाची समस्या आहे.

वंध्यत्वाची कारणे अधिक वय, शुक्राणूंचे विकार, स्त्रीबीजांची संख्या कमी असणे, अंडकोषाच्या आजूबाजूच्या नसा सुजतात, ब्लॉक्ड किंवा डॅमेज फेलोपियन ट्यूज शुक्राणूंना शरीरातून बाहेर पडणे अशक्य होते. ओवुलेशन समस्या वीर्य बाहेर येण्याऐवजी परत ब्लैडरमध्ये जाते. हार्मोनल इम्बॅलन्स, सिगारेट आणि अल्कोहोल सेवन, पिट्युटरी ट्युमर, लठ्ठपणा, वजन कमी असणे, एन्डोमेट्रिओसिस (गर्भाशयातील अस्तराची समस्या), तीव्र ताण, फायब्रॉइड्स किंवा पॉलीप्स (गर्भाशयात गाठी), लो स्पर्म काउंट ही कारणे आहेत.

काय काळजी घ्यायला हवी? वय २० ते ३५ वयोगटात असेल तर नैसर्गिकरीत्या एक वर्षासाठी गर्भधारणा करण्याचा सल्ला दिला जातो. तुमचे किंवा तुमच्या जोडीदाराचे वय ३५ वर्षांपेक्षा जास्त असेल आणि ६ महिने नैसर्गिकरीत्या गर्भधारणेचा प्रयत्न करूनही गर्भधारणा होऊ शकत नसेल, तर शक्य तितक्या लवकर योग्य फर्टिलिटी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. अनियमित मासिक पाळी, मेनोपॉजची स्थिती, मिसकॅरेंजेससारख्या समस्या किंवा पुरुषांमध्ये इरेक्शन- सारख्या इतर समस्या असतील, तर तत्काळ डॉक्टरचा सल्ला घ्यावा.

रोज किमान एक रुग्ण येथील बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयात वंध्यत्वाला घेऊन दररोज एक रुग्ण येत असतो. महिलांचे वंध्यत्व आधी तपासल्यानंतर तिच्या अहवालानंतर पुरुषांचीही तपासणी करतात. काहींची तपासणी सोबत केली जाते.

"दाम्पत्यांची सामान्य शारीरिक तपासणी करून त्यांची मेडिकल हिस्टरी घेतली जाते. ज्यामध्ये आनुवंशिकता, पूर्वी घेतलेले फर्टिलिटी उपचार, दुर्धर आजारांचे उपचार, प्रजनन अवयवांची सर्जरी, मिसकॅरेजेस, इन्फेक्शन्स, हार्मोनल समस्या, व्यसने, आहाराच्या सवयी अशी बरीच माहिती घेतली जाते." - ऋतू जैन, स्त्रीरोगतज्ज्ञ गोंदिया.

टॅग्स :Healthआरोग्यgondiya-acगोंदिया