शहरं
Join us  
Trending Stories
1
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
2
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
3
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
4
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
5
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
6
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
7
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
9
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
10
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
11
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
12
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
14
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
15
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
16
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
17
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
18
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
19
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
20
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते

क्षेत्राच्या खुंटलेल्या विकासाला जबाबदार कोण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 6:00 AM

चंद्रिकापुरे म्हणाले मागील निवडणुकीत पराभव झाल्याने आपण त्यांची खंत मानून गप्प बसलो नाही. उलट तेवढ्याच जोमाने मतदारसंघात सक्रीय झालो. कुठल्याही पदावर नसताना सुध्दा मतदारसंघातील शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याचा प्रयत्न केला. या सर्व गोष्टी मला सांगण्याची गरज नसून ते मतदारांना देखील ठाऊक आहे.

ठळक मुद्देमनोहर चंद्रिकापुरे : अर्जुनी मोरगाव तालुक्यात ठिकठिकाणी प्रचारसभा

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी मोरगाव : भाजप सरकारच्या माध्यमातून मागील पाच वर्षांत अर्जुनी मोरगाव मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकास कामे करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. मात्र या क्षेत्रात सिंचन,पायाभूत सुविधांचा दुष्काळ आणि रोजगाराचा प्रश्न कायम असल्याची ओरड स्वत: मतदार करीत आहे. मागील पाच वर्षात या क्षेत्राचा विकास खुंटला असून याला जवाबदार कोण आहे असा सवाल अर्जुनी मोरगाव मतदारसंघाचे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार मनोहर चंद्रिकापुरे यांनी केला.निवडणूक प्रचारार्थ गुरूवारी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील दाभना, निमगाव, खांबी, इंजोरी, पिंपळगाव, देवलगाव, येरंडी, बाराभाटी, अरतोंडी येथे आयोजित प्रचारसभेला संबोधित करताना ते बोलत होत. या वेळी प्रामुख्याने भागवत नाकाडे,गंगाधर परशुरामकर,अविनाश काशिवार,आनंद जांभुळकर, यशवंत गणविर, दादा संग्रामे, अरूणा मेश्राम, संजय गेडाम, नरेंद्र रंगारी, गिरीश पालीवाल,आर.के.जांभुळकर, दीपक सोनवाने उपस्थित होते. मनोहर चंद्रिकापूरे यांनी काही गावांमध्ये पदयात्रा आणि काही ठिकाणी प्रचारसभा घेऊन मतदारांशी संवाद साधला.चंद्रिकापुरे म्हणाले मागील निवडणुकीत पराभव झाल्याने आपण त्यांची खंत मानून गप्प बसलो नाही. उलट तेवढ्याच जोमाने मतदारसंघात सक्रीय झालो. कुठल्याही पदावर नसताना सुध्दा मतदारसंघातील शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याचा प्रयत्न केला. या सर्व गोष्टी मला सांगण्याची गरज नसून ते मतदारांना देखील ठाऊक आहे. मतदारसंघातील मतदारांनी आपल्यावर व्यक्त केलेल्या विश्वासामुळेच आपण पुन्हा निवडणूक रिंगणात आहोत.आपली ताकद आणि शिदोरी ही मतदारसंघातील मतदार आणि त्यांचे प्रेम हिच आहे.त्यामुळे तो विश्वास यापुढे सुध्दा कायम ठेवतील असा आपल्याला विश्वास आहे. या क्षेत्राचे विद्यमान लोकप्रतिनिधी मागील दहा वर्षांत या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकास कामे झाल्याचा दावा करीत आहे. मात्र ती झाली असती तर या क्षेत्राचा चेहरा मोहरा का बदलला नाही. झाशीनगर उपसा सिंचन योजनेचे भिजत घोंगडे का कायम आहे? राईस पार्कची स्थापन करुन स्थानिकांना रोजगाराच्या संधी का उपलब्ध करुन देण्यात आल्या नाहीत. मतदारसंघातील रस्त्यांची दुदर्शा का झाली आहे. मागील दहा वर्षांत एकही मोठा प्रकल्प या मतदारसंघात का आला नाही.या सर्व प्रश्नांची उत्तरे ते जनतेला का देत नाही असा सवालही चंद्रिकापुरे यांनी केला. त्यामुळेच आघाडी सरकारचा मोठ्या घोषणांवर नव्हे तर प्रत्यक्ष विकास कामे करण्यावर विश्वास असल्याचे सांगितले. या मतदारसंघातील मतदारांनी आपल्याला संधी दिल्यास या क्षेत्राचा नक्कीच कायापालट करु अशी ग्वाही त्यांनी दिली.

टॅग्स :arjuni-morgaon-acअर्जुनी मोरगाव